india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना पाठिंब्याचे पत्र केले सुपूर्द

 

सोलापूर : प्रतिनिधी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना मनपा यांनी महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंबाचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

 

 

 

 

 

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना मनपाचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपणे आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे गरजेचे आहे. याबाबत शिक्षक आणि पदवीधरांशी चर्चा केल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचे आमच्या संघटनेचे मत बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देत असल्याचे राज्याध्यक्ष श्री. जवंजाळ यांनी सांगितले.

संघटनेचे पदवीधर मतदारसंघातील ३५० मतदार आणि शिक्षक मतदार संघातील २२० मतदार महायुतीचे उमेदवारांना मतदान करणार असल्याचेही  जवंजाळ यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

 

हे पाठिंबाचे पत्र देताना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, राज्य प्रतिनिधी स्वप्निल चाबुकस्वार, संघटक आनंद सामल, राहुल पाटील, किरण शेळगे, रणधीर तांबिले, केशव गलगली, धीरज कुचेकर, बसवराज माळी, विठ्ठल वाघमोडे, मिलिंद खंदारे, संतोष सुतार, विशाल मनाळे, गंगाधर कांबळे, विजय टेकाळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button