crimemaharashtrapoliticalsocialsolapur

गंभीर वैद्यकीय स्थितीची दखल; आरोपीस खासगी रुग्णालयात उपचारास विशेष न्यायालयाची परवानगी

 

सोलापूर

कामती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. १६७/२०२३ मधील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सद्दाम रशिद शेख हा वैद्यकीय कारणास्तव सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल आहे . आरोपीने पुढील वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी आरोपीच्या वतीने विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.

 

 

 

 

सदर अर्जाचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड प्रणव उपाध्ये यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील पोस्ट-ऑपरेटिव्ह उपचार व वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता आहे. तसेच आरोपीस झटके येण्याचा त्रास असून Brain MRI करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच आरोपीची स्थिती अधिक संवेदनशील असल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यामुळे आरोपीच्या वैद्यकीय स्थितीचा व आवश्यक उपचारांचा विचार करून खासगी रुग्णालयात पुढील उपचार घेण्यास परवानगी देण्यात यावी, असा युक्तिवाद केला.

 

विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय स्थिती व उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन आरोपीच्या वतीने दाखल केलेला अर्ज अटी व शर्तीवर मंजूर केला असून, आरोपीस खासगी रुग्णालयात पुढील आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्यास परवानगी दिली आहे.

 

 

यात आरोपीतर्फे ॲड प्रणव राहुल उपाध्ये, ॲड ईश्वरी अतुल न्यामणे यांनी तर सरकार तर्फे ॲड शितल डोके यांनी काम पाहिले .

स्पेशल केस नंबर 165/2023
कोर्ट ए बी भस्मे साहेब
स्पेशल* न्यायाधीश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button