पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय साळुंखे, सचिवपदी गुरु कोळी

पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संजय साळुंखे, तर सचिवपदी गुरु कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली.
पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष अजय दासरी, सचिव पांडुरंग दीड्डी, तसेच रामचंद्र जन्नू, दत्तात्रय कारमपूरी यांच्यासह माजी विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी सन २०२६-२७ साठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष मनोज पिस्के, प्रवीण बत्तूल, अर्जुन मोहिते, अनिल वंगारी, सत्यनारायण गोसकी व लक्ष्मीकांत सरगम, तर कार्याध्यक्ष श्रीनिवास आडम यांची निवड करण्यात आली.
सहसचिव श्रीनिवास बोगा, खजिनदार सुहास पल्ली, सहखजिनदार नागेश मंजेळी, प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम, मिरवणूक प्रमुख सागर अतनुरे व लखन भोसले, तर कार्यालय प्रमुख नरेंद्र बोमेन यांची निवड करण्यात आली.
तसेच समन्वय समितीमध्ये नागेश गंजी, सूर्यकांत जिंदम, गोविंद चिंता, अंबादास अमृतम, श्रीकांत कोंडा आदींची निवड करण्यात आली. याचबरोबर महिला पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव ‘डीजे मुक्त’ करण्याचा निर्धार
पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना पुढे नेली आहे. त्याच उद्देशाने यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणूक डीजेमुक्त करण्याचा निर्णय नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड बैठकीत घेण्यात आला.
गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी डीजेमुक्त मिरवणुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून पूर्व विभागातील गणेश मंडळांना एकत्रित करून गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी सांगितले.



