india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

दमदार‎ युवा आमदार‎ देवेंद्रदादांच्या दीर्घायुष्यासाठी‎ ग्रामदैवत‎ श्री सिद्धरामेश्वर चरणी साकडे

रुद्राभिषेक‎ व‎ महाआरतीनंतर अन्नदान‎ सेवेसाठी धान्य‎ देत‎ ‘ईच्छा‎ भगवंताची’ मित्र‎ परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 

सोलापूर :(प्रतिनिधी )‎

 

 

सोलापूर शहर मध्य विधानसभा‎ मतदारसंघाचे‎ दमदार‎ युवा‎ आमदार देवेंद्रदादा कोठे‎ यांच्या वाढदिवसानिमित्त‎ त्यांच्या‎ उत्तम‎ आरोग्यासह दीर्घायुष्य आणि जनसेवेचे कार्य अखंड‎ सुरू राहावे,‎ यासाठी‎ ‘ईच्छा‎ भगवंताची’‎ मित्र‎ परिवार तसेच‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ मधील‎ भाजपा नगरसेवक,‎ नगरसेविका, पदाधिकारी‎ व कार्यकर्त्यांच्या वतीने ग्रामदैवत‎ श्री‎ शिवयोगी‎ सिद्धरामेश्वर महाराज‎ मंदिरात रुद्राभिषेक, विधिवत पूजा-अर्चा व महाआरती करण्यात आली. यावेळी श्री‎ सिद्धरामेश्वर‎ महाराजांच्या‎ चरणी आमदार‎ कोठे यांच्या‎ दीर्घायुष्यासाठी साकडे‎ घालण्यात‎ आले. आमदार‎ कोठे‎ यांनी‎ वाढदिवसानिमित्त‎ पुष्पगुच्छ, हार,‎ फेटा,‎ शाल आदी‎ सत्कार‎ साहित्य न‎ आणता‎ अन्नदानासाठी धान्य व‎ गरजू विद्यार्थ्यांना‎ शैक्षणिक साहित्य‎ देण्याचे आवाहन‎ केले होते.‎ या‎ आवाहनाला प्रतिसाद‎ देत १.२५‎ क्विंटल गहू,‎ तांदूळ व‎ अन्य‎ अन्नधान्य अन्नदान‎ सेवेसाठी देण्यात आले.‎

 

 

याप्रसंगी भाजपा नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका  चैत्रालीताई शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड, युवा‎ नेते‎ चेतन नागेश अण्णा गायकवाड,‎ श्रीमती लक्ष्मीताई‎ नडगिरी, राधिकाताई‎ खांबसकर, दिपालीताई हटकर, लक्ष्मीताई आठवले,रमेश‎ चलवादी, श्रीकांत‎ गिड्डे, उमेश‎ जाधव,‎ निखिल‎ गंभीरे, माणिक‎ कांबळे,‎ महादेव‎ राठोड,‎ वैभव प्रचंडे,‎ सुनील कांबळे,‎ प्रतीक जाधव, हुलगप्पा‎ शासम, फिरोज‎ पठाण‎ आदी‎ उपस्थित होते. यावेळी किसन जाधव म्हणाले.

 

 

आमदार देवेंद्रदादा कोठे‎ यांच्या‎ विकासाभिमुख‎ नेतृत्वामुळे सोलापूरच्या‎ विकासाला गती‎ मिळाली‎ आहे. उद्योग, रोजगार, पायाभूत‎ सुविधा‎ आणि नागरिकांच्या प्रश्नांना‎ प्राधान्य‎ देत त्यांचे‎ कार्य सुरू‎ आहे.‎ देव, धर्म, देश आणि विकासाचा विचार घेऊन‎ त्यांचे कार्य‎ अखंड‎ सुरू‎ राहावे,‎ त्यांना‎ उत्तम आरोग्य‎ व दीर्घायुष्य‎ लाभावे,‎ यासाठी‎ श्री‎ सिद्धरामेश्वर महाराजांच्या‎ चरणी प्रार्थना‎ केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद‎ देत‎ अन्नदानासाठी‎ धान्य‎ देणे,‎ हीच आमच्या‎ लाडक्या नेत्याला‎ वाढदिवसाची खरी शुभेच्छा‎ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button