देव देश धर्माच्या कार्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता
आमदार देवेंद्र कोठे : प्रभाग क्रमांक १५ मधील रामलाल चाळ येथील सभा मंडपाचे भूमिपूजन

विकासासाठी आम्ही कमी पडू न देण्याचे आमदार देवेंद्र कोठे आश्वासन
सोलापूर : प्रतिनिधी
देव देश धर्माच्या कामाला प्राथमिकता देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून रामलाल चाळीतील सभा मंडप परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रामलाल चाळ येथील सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार देवेंद्र कोठे, ज्येष्ठ नागरिक अरुणसिंह परदेशी आणि महादेव स्वामी यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका विजया खरात, अंबादास करगुळे, मंडल अध्यक्ष नागेश खरात उपस्थित होते. येथील सभा मंडपामुळे परिसरातील नागरिकांना सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रामलाल चाळ मैदानावर देव देश धर्माच्या कार्याचे संस्कार देण्यात येतात. तसेच सामाजिक कार्याचेही संस्कार देण्यात येतात. त्याकरिता विशेषतः लहान मुले, तरुणांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. येथून संस्कार घेतलेल्या तरुणांच्या माध्यमातून सोलापूरचे पर्यायाने देशाचे भविष्य उज्वल होईल, याचा ठाम विश्वास आहे. शहरात अन्यत्रदेखील असे सभा मंडप उभारण्याचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे रामलाल चाळ परिसरसह शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी अजयराणा यादव, विजयानंद स्वामी, शाहू सलगर, यशवंत पाथरूट, राजेंद्र स्वामी, प्रमोद कदम, ओंकार राजगे, श्रवण साबळे, चंद्रकांत यमगर, लक्ष्मण दिकोंडा, चंद्रकांत निमगर, प्रभाकर मागास, रोहित खताळ उपस्थित होते.
————
चौकट
शक्तीकेंद्र प्रमुखांच्या निवासस्थानी दिली भेट
रामलाल चाळ येथील सभा मंडप भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुबणे चाळ येथील भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख चंद्रकांत निमगल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. निवडणूक नसतानाही आमदारांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, निष्ठेने काम करणाऱ्या सर्वसामान्य शक्तीकेंद्र प्रमुखांच्या निवासस्थानी जाऊन आपुलकीने संवाद साधल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.



