अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्रकरण: सिव्हील हॉस्पीटलच्या डॉक्टरसह आरोपी विजय गर्ज यांचा जामीन अर्ज न्मायालयाने फेटाळला: जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत….

सोलापूर :
सोलापुरातील सिव्हील हॉस्पीटलमधून बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेल्या प्रकरणातील आरोपी डॉ. सतीश भाऊराव कनाके आणि विजय बाबासाहेब गर्जे या दोन्ही आरोपीचा जामीनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उल्का जोशी मॅडम यांनी फेटाळून लावला आहे.
सदर प्रकरणात सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मः ती शासकीय वैदयकीय महाविदयालय व छत्रपती महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांनी सदर बझार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता राजेश जाधव, महेश बारगजे, राजेश ढवण, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसिम खान, सागर रजपूत, सतिश कनाके यांच्याविरुद्ध भा. न्या.सं. चे कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४० (२), २३३,२३५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना अटक केली आहे.
यात हकीकत अशी की, सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ राजेश भाऊसाहेब जाधव हा पूर्वीपासून पाटबंधारे विभाग येथे दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरीस आहे. परंतु ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने सुरवातीस अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पीटलमधील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास तेथे त्याची वैदयकीय तपासणी करण्यास सांगितल्यावर तो तेथून निघून गेला होता. त्यानंतर त्यास तेथील सिव्हील हॉस्पीटलच्या बाहेर आरोपी क्र. २ महेश बारगजे हा भेटल्यावर महेश बारगजे याने राजेश जाधव यास त्याचे घरी
बोलावून घेवून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याचे रुपये पाच लाख घेतले व त्याचे पूर्वीचे मूळ दिव्यांगप्रमाणपत्र, मूळ आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स प्रत दिली होती. त्यानंतर महेश बारगजे यांनी सदर पाच लाख रुपयांपैकी दोन लाख रुपये स्मृतः घेतले होते. त्यानंतर महेश बारगजे यांनी त्याची पूर्वीच सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथे राजेश ढवण नोकरीस असताना ओळख होती व महेश बारगजे यांना महेश ठवणशी ओळख झाल्यावर समजले होते की, राजेश ढवण बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतात म्हणून महेश बारगजे यांनी राजेश ढवण यास राजेश जाधवचे कागदपत्रे व रुपये दोन लाख देवून राजेश जाधव याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यास सांगितले होते. राजेश इवणने सदर पैसे व कागदपत्र घेवून तो पूर्वी पाथर्डी येथे उपजिल्हा रुग्णालयात नोकरीस असताना तेथील जिल्हा परिषद शिक्षक विजय गर्जे यांची ओळख झाल्यावर विजय गर्जे यांनी रमेश ठवण यास सांगितले होते की, वैदयकीय संदर्भातील कोणतीही कामे ते करतात, त्याची खूप ओळख आहे. त्यामुळे महेश बारगजे यांच्याकडून घेतलेले दोन लाख पैकी एक लाख पंच्याहत्तर हजार व राजेश जाधव याची कागदपत्रे राजेश ढवण याने विजय गर्जे यास राजेश जाधव याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी दिले. त्यानंतर विजय गर्जे यांनी त्याचे ओळखीचे अरुण शिंपी, रा नाशिक यास राजेश जाधव याचे बनावट आधारकार्ड काढण्यासाठी राजेश ढवण कडून घेतलेल्या एक लाख पंव्याहत्तर हजार रुपयांपैकी पंचावन हजार देवून सोबत राजेश जाधव याचे कागदपत्र दिले. त्यानंतर अरुण शिंपी यांनी राजेश जाधव याचे सोलापूर मधून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सोलापूर पेथील पत्ता आवश्यक असल्याने राजेश जाधव याचे आधारकार्डवरील मूळचा अहिल्यानगर येथील पत्ता अरुण शिंपी याने नाशिक येथील सायबर कॅफे मध्ये बदलून तेथे सोलापूर येथील सिद्धार्थ सोसायटी, सोलापूर असा पत्ता टाकून नाशिक येथील एका सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला होता. त्या सायबर कॅफेमधील संगणक जप्त केला आहे. आरोपी नागे अरुण शिंपी यांनी सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपीक नामे वसिम खान व सागर रजपूत याचे द्वारे राजेश जाधव याचे बनावट दिव्यांग
प्रमाणपत्र काढून दिल्याचे व त्या बदल्यात वसीम खान व सागर रजपूत यांनी कमीशन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अरुण शिंपी यांनी त्याचे मुलीच्या खात्यावरुन ऑनलाईन वसिम खान याच्या सांगण्यावरुन सागर रजपूत पाचे मोबाईल नंबर यावर अरुण शिंपीची मुलगी रुपाली गणेश दिवटणकर याचे मोबाईलद्वारे २१/५/२०२६ रोजी नव्यान्नव हजार रुपये व २२/५/२०२६ रोजी शहात्तर हजार रुपये घेतले होते. तसेच १७/७/२०२६ रोजी अरुण शिंपी यांनी
त्याच्या फोन पे वरुन सागर रजपूत यास त्रेपन्न हजार रुपये पाठविले होते. सदर गुन्ह्यातील आरोपीतांनी युडीआयडी पोर्टलद्वारे आरोपी क्र १ राजेश जाधव यास त्याची कोणतीही वैदयकीय चाचणी न करता बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आरोपी क्र२ ते ८ यांनी कमीशन घेवून काढून दिले.
सदर प्रकरणात दोन्ही आरोपीतर्फे जामीन मिळणेकामी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर सरकार पक्षातर्फे अॅड डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी तीव्र विरोध केला व मा. न्यायालयाच्या निदर्शनास अनेक महत्वाच्या गोष्टी आणल्या. ज्यात त्यांनी सांगितले की, सदर गुन्हा हा गंभीर कुरुपाचा फसवणुकीचा आहे. या गुन्हयाचा तपास अजुन चालू असून तसेच एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. ज्यात सिव्हील हॉस्पीटलचे दोन वरिष्ठ लिपीक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय अधिकारी यांचेसह इतर पाच आरोपी आहेत. तसेच ज्या सायबर कॅफेमधून बनावट आधार कार्ड तयार केले तेथील संगणक जणी पंचनाम्याद्वारे जप्त केला आहे. आरोपीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ज्यात त्यांचे एकमेकांसोबतचे व्हॉटस अॅप चॅटींग आर्थिक देवाणघेवाण झालेले पुरावे आहेत. तसेच सदर प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सामील आहेत याचा तपास सुरु आहे. आतापर्यंत किती बोगस प्रमाणपत्रे कोणाकोणाच्या माध्यमातून किती रकम स्विकारुन देण्यात आली याचा तपास सुरु आहे तसेच मूळ व बनावट कागदपत्रे आरोपींच्या ताब्यातून जप्त केल्याची बाब मा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली यासोबतच अनेक आरोपींवर अनेक गुन्हे दाखखल असून सदर आरोपी हे अटटल गुन्हेगार आहेत. तसेच सदर आरोपींना जामीन दिल्यास ते सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करण्याची दाट शक्यता आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उल्का जोशी यांनी सदर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. पी. बी. भिसे व अॅड. शहानवाज शेख यांनी काम पाहिले.



