crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

खुनाच्या आरोपाखाली झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:-ॲड.रितेश थोबडे…

 

सोलापूर

 

प्रकाश अशोक चव्हाण रा. सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला भीमाशंकर सिद्राम झळके रा सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद जाधव व नंदेश देशपांडे यांनी जामीन मंजूर केला.

 

 

 

या हकीकत अशी की, मयत प्रकाश याचे रेडिमेड कपड्याचे दुकान हे एमआयडीसी अक्कलकोट रोड येथे चालवीत होता. तसेच मयत हा भिशी देखील चालवत होता. ती भिशी मयत व आरोपी भीमाशंकर तसेच आणखीन एक आरोपी अशी तिघे मिळून चालवीत होते, त्यांच्यामध्ये भिशेच्या पैशाच्या देवाण-घेवाणी वरून वाद होता. दिनांक:- २४/०७/२०१७ रोजी दुपारी बारा वाजता मयत हा त्याच्या कपड्याच्या दुकानात गेला होता, त्यावेळी तो दुकानात एकटाच होता साधारण १:४५ वाजेच्या सुमारास प्रकाशच्या वडिलांना नातेवाईकांनी फोन केला की, प्रकाश यास जीवे ठार मारले आहे.

 

 

 

त्यावरून प्रकाशच्या वडिलांनी पोलिसांना दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले, त्या सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यामध्ये आरोपी भीमाशंकर व दुसरा आरोपी यांनी प्रकाश याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्यास जीवे ठार मारल्याचे दिसत असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली होती. सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे चालला होता त्यात न्यायालयाने झळकीसह एकास खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

 

 

 

 

त्यावर झळकी याने ॲड रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अपील दाखल करून त्यामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात सरकारी पक्षाचा पुरावा हा केवळ सीसीटीव्ही फुटेजवर आधारित असून ज्या साक्षीदारांनी आरोपींना ओळखले त्यांची ओळख ही कागदोपत्री पुराव्याशी सुसंगत असली पाहिजे असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी 25,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲड. अश्विनी टक्कळकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button