Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला शाळेकरिता जागा देण्याच्या निर्णयावर शासनाचे शिक्कामोर्तब

.

 

सोलापूर : प्रतिनिधी

श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला शाळेकरिता ३ हजार ९१० चौ. मी. जागा देण्याच्या निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब केले. सोमवारी याबाबत महसूल व वन विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी गेल्या
गेल्या ३४ वर्षांपासून होत होती. याबाबत समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे मागणी केल्यानंतर मोची समाजाची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १८ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

 

 

त्यानुसार उत्तर सदर बझार येथील टीपी ३ फायनल प्लॉट नंबर ५८ फायनल एकूण क्षेत्र ५ लाख २० हजार २०. ८ चौ. मी. पैकी आरक्षण क्र. ६/१४ – ए – माध्यमिक शाळेसाठी आरक्षित व निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेल्या ३ हजार ९१० चौ. मी. शासकीय जमिनीपैकी श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ, सोलापूर यांना शैक्षणिक प्रयोजनासाठी २ हजार ३४६.०० चौ. मी. क्षेत्र प्रचलित बाजार मूल्याच्या २० टक्के रक्कम वसूल करून कब्जेहक्काने तसेच क्रीडांगण या प्रयोजनासाठी १ हजार ५६४.०० चौ. मी. क्षेत्र वर्षाला एक रुपया या नाममात्र दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

 

 

 

 

यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली. आणि अवघ्या काही महिन्यांतच मोची समाजाच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.
———-
चौकट

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठेंना पाठवला शासन निर्णय

श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला शाळेकरीता जागा देण्याचा शासन निर्णय काढण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून स्वतः आमदार देवेंद्र कोठे यांना हा शासन निर्णय पाठवला. राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून विकासासाठी धडपडणाऱ्या तरुण आमदारांना शासन निर्णय पाठविणे म्हणजे तरुण आमदारांना विकासासाठी बळ देण्याची कृती असल्याची चर्चा सोमवारी पुणे येथे झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सुरू होती.
————

कोट

विशेषतः मोची समाजाकरिता शैक्षणिक सोय झाल्याचा आनंद

मोची समाज सोलापूर शहरात मोठ्या संख्येने राहत असूनही आजवर या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बहुमोल सहकार्यामुळे मोची समाजाच्या शिक्षणविषयक प्रश्नाची सोडवणूक करण्यात यश मिळाले. येथून कष्टकरी मोची समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्यातच या निर्णयाचे यश आहे.
—- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button