crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मजरेवाडी येथील हत्ये प्रकरणी आरोपींना न्यायालय कोठडी. :- अँड. संतोष न्हावकर..

सोलापूर

 

लोकमान्य नगर, मजरेवाडी येथील रहिवासी अल्ताफ शेख याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी मतीन गजनफर शेख,मुशफ आयुब सय्यद शोएब आयुब सय्यद व सद्दाम इनामदार सर्व रा.लोकमान्य नगर, मजरेवाडी,सोलापूर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (श्री. दिपक कखरे ) यांनी दिले.
यात हकिकत आशी की, फिर्यादी सुफीयान ईर्षाद शेख याचे आरोपीच्या पत्नी सोबत मागील पाच ते सहा महिन्यापासून प्रेम सबंध असून ते आरोपीस समजल्याने फिर्यादीस मतीन याच्या पत्नीने फोन करून आपले जे प्रकरण आहे, ते मिटविण्यासाठी तू घरी ये असे म्हटल्याने फिर्यादी तिच्या घरी गेला होता त्यावेळी फिर्यादी हा तिच्या घराबाहेर जावून तुझ्या नवर्‍याला बाहेर बोलाव परंतु त्यावेळी मतीन हा घरी नसल्याने फिर्यादी घरात जात असताना मतीन हा त्याठिकाणी बाहेरून आला आणि अचानकपणे तेथील पाण्याच्या पाईपने व लाकडने फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

 

 

 

त्यावेळी फिर्यादी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यावेळी मतीन याने कोणाला तरी फोन करून बोलावून घेतले त्यानंतर काही वेळाने त्याठिकाणी फिर्यादीच्या ओळखीचे मतीन चे नातेवाईक सद्दाम इनामदार, मुशफ सय्यद, शोएब सय्यद असे आले त्यावेळी सद्दाम याच्या हातात लोखंडी रॉड होता,त्या लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले त्यानंतर मुशफ सय्यद, शोएब सय्यद या दोघांनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी व हाताने मारहाण करून तू परत गल्लीत दिसल्यास तर बघुन घेईन असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादी आरडा ओरडा केल्याने मामा अल्ताफ शेख, भावजी सोहेल शेख, मामाची मुलगी सानिया व आशिया, बहीण सुहाना व शहाणा , मावस भाऊ मुश्ताक शेख तेथे आले व त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीचे भावजी सोहेल शेख हा भांडण सोडविण्यासाठी पुढे आला असता त्यास मुशफ सय्यद याने हाताने डाव्या डोळ्यावर बुक्की मारून जखमी केले त्यावेळी सोहेल यास सोडविण्यासाठी मामा अल्ताफ शेख गेला असता त्याला हाताने व लाथाने त्याच्या छातीत जोरात मारले त्यामुळे त्याच्या नाका तोंडातून रक्त येवू लागले म्हणून त्यास हॉस्पिटल मध्ये त्याचे नातेवाईक घेवून गेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.

 

 

 

 

 

यात पोलिसांनी आरोपी मतीन शेख यास घटनेच्या दिवशी अटक केली होती त्यास मे. कोर्टाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर मुशफ सय्यद व शोएब सय्यद यांना दि.31/8/26 रोजी अटक केली होती त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे व सद्दाम इनामदार यास दि.1/9/26 रोजी अटक केली होती त्यास एक दिवसाची म्हणजेच सर्व आरोपींना आज रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
यात आरोपी मतीन शेख,मुशफ सय्यद व शोएब सय्यद यांच्या तर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी हजर होवून युक्तिवाद करताना आरोपीकडून हत्यार जप्त केले असल्याने व आरोपीकडून आता कोणताही तपास करण्याचे नसल्याचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

 

 

 

 

यात मतीन शेख,मुशफ सय्यद व शोएब सय्यद यांच्यातर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. राहुल रूपनर, अ‍ॅड. मीरा पाटील व आरोपी सद्दाम इनामदार तर्फे अँड. राज म्हात्रे यांनी तर सरकारतर्फे अँड. मांजरे मूळ फिर्यादीतर्फे अँड. बि. डी.कट्टे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button