crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी !  कॉपर वायर चोरीचे एकूण 11 गुन्हयांची उकल…

दिनांक 29/08/2026

 

 

शेतातील इलेक्ट्रीक पंम्प, पानबुडी मोटार, केबल वायर व इतर शेतीउपयोगी साहित्यातील एकूण 235 किलो ग्रॅम वजनाचे कॉपर वायर जप्त करुन 3,04,200 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
—————————————–
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक  संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये इलेक्ट्रीक पंम्प, पानबुडी मोटार मधील कॉपर वायर चोरींच्या गुन्हयांची उकल करणेकामी आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप* यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास इलेक्ट्रीक मोटारीतील कॉपर वायर चोरीच्या गुन्हयांची उकल व सदर मोडसचे आरोपींना चेक करुन गुन्हे उकल करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

 

 

 

 

त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे येथील मौजे सय्यद वरवडे या गांवात हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे सय्यद वरवडे ता. मोहोळ जि. सोलापूर येथील रेकॉर्डवरील इसम याने मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर येथील गांवातून नदीपात्रालगत असलेल्या पानबुडी मोटारी, शेतातील इलेक्ट्रीक मोटारी मधील तांबा तार, केबल वायर यांची चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदरची बातमी *मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण* यांना कळविले असता, त्यांनीसहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

 

 

 

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मौजे सय्यद वरवडे ता. मोहोळ जि. सोलापूर येथे हजर असताना, मिळालेल्या बातमीतील इसम हा त्याचे राहत्या घराजवळ असलेल्या पडिक खोलीजवळ बसलेला दिसला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, त्यास सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्याचे नांव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव 1) रविंद्र उर्फ रवि, उर्फ गोटया चंद्रकांत पवार , वय 25 वर्षे, रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले.

 

 

 

 

त्याच्याकडे मिळालेल्या बातमीप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करता, त्याने मागील 06 महिन्यापासून तो स्वत: व त्याचा साथिदार नामे 2) पप्पू शिंदे, रा. तामदर्डी ता. मंगळवेढा जि. सोलापूर याचे सोबत मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल, पापरी, अंकोली, पेनुर, देगांव, भोयरे, पासलेवाडी व पंढरपूर तालुक्यातील खरसोळी, धोंडेवाडी, इश्वर वठार तसेच पडसाळी ता. उत्तर सोलापूर* इत्यादी गांवामध्ये रात्रीच्या वेळी जावून शेतातून नदी पात्रातून मोटारी, पानबुडी मोटारी, केबल वायर चोरुन आणल्यानंतर ते शेतातील रानामध्ये मोटारी फोडून केबल वायर जाळून वेळोवेळी वेगवेगळया पोत्यामध्ये भरुन त्याची विक्री करीत असलेबाबत सांगितले. त्याचेकडून त्याच्या घरातील पडक्या एका खोलीमध्ये चोरीकरुन विक्रीकरीता ठेवलेले एकूण 13 तांब्याचे तार प्लास्टिकच्या पोत्यामध्ये मिळून आले. सदर आरोपीने चोरी केलेले ठिकाण दाखविले असता, त्याबाबत संबंधीत पोलीस ठाणेचे अभिलेख पाहिले असता, त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

 

सदर आरोपीस मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 670/2026 बीएनएस 303(2) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.*

सदर अटक आरोपी नामे 1) रविंद्र उर्फ रवि, उर्फ गोटया चंद्रकांत पवार , वय 25 वर्षे, रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ जि. सोलापूर याचे गुन्हेगारी अभिलेख पाहिले असता, त्याचेवर टेंभूर्णी पोलीस ठाणे गुरनं 389/2023 भादविसंक 457, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ/ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडिबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button