मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन प्रकरणी चार विद्यमान आमदारासह ईतर आरोपी न्यायालयात हजर…

सोलापूर
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे,राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या सह 48 जणांपैकी 30 आरोपींनी दाखल गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (श्री.शिंदे सो) यांचे समोर आज हजेरी लावली.
यात हकीकत अशी की, दि.4/7/21 रोजी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चास कोविड 19 चा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने परवानगी नाकारली होती असे असताना मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार यांनी मोर्चा काढलेला होता सदर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे व राजेंद्र राऊत यांच्यासह सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलीस सब इन्स्पेक्टर सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती सदर गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सदर खटल्याचे समन्स आरोपींना प्राप्त झाल्याने विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे व राजेंद्र राऊत यांच्यासह ईतर आरोपी आज रोजी मे. न्यायालयात हजर झालेले होते.
यात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे व राजेंद्र राऊत वगैरे आरोपीतर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सचिन साखरे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड.राज म्हात्रे,ॲड. अजिंक्य जाधव यांनी तर सरकार तर्फे ॲड. संतोष पाटील यांनी काम पाहिले.



