crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सराफ व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर:-अँड. शैलेश पोटफोडे

 

सोलापूर-

 

सराफ बाजार येथील सोने चांदी व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी राम व्यंकटेश शेठ, लक्ष्मण व्यंकटेश शेठ ,प्रकाश शिवाजी पवार व विवेक श्रीकांत भंडारकवठेकर यांच्या विरोधात जोडभावीपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रकाश शिवाजी पवार व विवेक श्रीकांत भंडारकवठेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (श्रीमती. जोशी) यांनी नामंजूर केला.
यात हकिकत आशी की, सन 2014 ते सन 2023 या कालावधीतील सोने खरेदी केलेल्या पावत्या, दुकानातील झालेला व्यापार, तारण म्हणुन ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्याचे व्याजाबाबत तसेच मनिलँडीन मधील नफ्याबाबत हिशोब केला.

 

 

 

असता रामु शेठ, लक्ष्मण शेठ व दुकानातील कामगार प्रकाश पवार, विवेक भंडारकवठेकर या सर्वांनी संगणमत करुन दुकानातील व्यापारामधील नफ्यामध्ये अफरातफर करणे, सोने तारण ठेवुन घेतले व ते परस्पर ग्राहकांना देवुन त्यामध्ये मिळणारा नफा स्वतः घेणे, मनीलँडीग मधील संपूर्ण नफ्याची रक्कम स्वतः घेणे, दुकानातील भांडवल म्हणुन असलेल्या सोन्याच्या भिशा लावुन त्या भिश्या उचलणे, दुकानामध्ये झालेल्या रोख रक्कमेचा हिशोब लपवुन ती रक्कम स्वतः घेणे, दुकानामध्ये सोने गहाण ठेवण्याकरीता आलेल्या ग्राहकांचे सोने घेवुन त्यांच्या नावाची पावती न करता स्वतःच्या नावाची पावती करून ठेवुन घेणे, ग्राहकांकडुन गहाण ठेवुन घेतलेल्या दागिन्याचे जास्त व्याजदर घेवुन ते दागिने परस्पर ग्राहकांना परत करणे, परगावच्या व्यापाऱ्यांना व कारागिर यांना दुकानातील व्यापाराम्थील सोने परस्पर उधार देणे, व्यापारामधुन जमा झालेल्या रक्कमेतुन एलआयसी, इन्शुरन्स काढणे, स्वतःच्या तरोच कामगारांच्या खात्यावर रोख रक्कमा जमा करून ते काढून घेणे, कारागिर यांना व्यापारातील 24 कैरेटचे सोने देवुन त्यांच्याकडुन दागिने तयार करुन ते बाहेर चे बाहेर विक्री करुन मिळणारा नफा स्वतः घेणे, बँकेने काढलेल्या लिलावामध्ये फिर्यादीच्या परस्पर सहभागी होऊन दुकानामध्ये जमा असलेल्या रक्कमेतुन सोने खरेदी करणे, ग्राहकांचे येणारे पेमेंट परस्पर आरोपी प्रकाश पवार व विवेक भंडारकवठेकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या
खात्यावर ऑनलाईन पाठविण्यास सांगुन ती रक्कम परस्पर वाटून घेणे अशा रितीने फिर्यादी च्या दुकानातील व्यवसायात अफरातफर करुन एकूण 1230 ग्रॅम वजनाचे सोने तसेच मनीलेंडीग व व्यापारामधील मिळालेला एकूण नफा 84,52,200/- रुपये एवढी रोख रक्कम वरील चौघांनी संगणमत करुन स्वतःच्या फायद्याकरीता वाटुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केली व त्या कालावधीतील हिशोब विचारणा केला असता फिर्यादीस शिवीगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद गणेश गुरुराय पावसकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

 

 

 

प्रस्तुत गुन्ह्यात अटक होईल ह्या भीतीपोटी प्रकाश शिवाजी पवार व विवेक श्रीकांत भंडारकवठेकर या दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
सदर जामीन अर्जात मूळ फिर्यादी सराफ व्यापारी गणेश गुरुराय पावसकर यांच्या मार्फत अँड. शैलेश पोटफोडे यांनी हजर होवून युक्तिवाद करताना जामीन अर्जास तीव्र विरोध करून मूळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र सादर केले व सरकार पक्षातर्फे अँड. दत्ता पवार यांनी युक्तिवाद करताना आरोपीकडून रक्कम व सोने हस्तगत करायचे असल्याने आरोपींना अटक केल्यानंतर हस्तगत होणार असल्याचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

यात मूळ फिर्यादीतर्फे अँड. शैलेश पोटफोडे,सरकारतर्फे अँड.दत्ता पवार यांनी तर आरोपीतर्फे अँड. अजिंक्य जाधव यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button