crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अज्ञात कारणावरून देशमुख पाटील वस्तीत युवकाने घेतला गळफास…

सोलापूर / प्रतिनिधी

क्राइमझोन

यात थोडक्यात हकीकत अशी की, देशमुख पाटील वस्ती येथील रहिवासी अक्षय भागवत शिंदे वय ३० वर्षे याने गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घरातील स्लॅब च्या लोखंडी हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या ही बाब निदर्शनास येताच अक्षयला तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

 

 

 

मात्र उपचारापूर्वीच अक्षय मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . डॉ.प्रदीप खरात यांच्या जबाब वरून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापाठीमागचे नेमके कारण काय ? याचा तपास पोलिसांकडून जलद गतीने करण्यात येतोय..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button