सोलापूर तालुका, पोलीस ठाणे ! ईद ए मिलादच्या अनुषंगाने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन मौजे बोरामणी ता.द.सोलापूर येथे रूट मार्च ( पथ संचलन )…

दिनांक 25.08.2026
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री.विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री.सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात आगामी काळात येणारे / होणारे सण, उत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणा मध्ये पार पाडणे करीता मौजे बोरामणी येथे दिनांक 25.08.2026 रोजी सायंकाळी 06.00 ते 07.00 या कालावधीत रूट मार्च (पथ संचलन) घेण्यात आले आहे.

सदर रूट मार्च (पथ संचलन) चे वेळी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी गावडे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ कदम तसेच सोलापूर तालुका, पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार तसेच गृहरक्षक दल ( होमगार्ड ) यांनी सहभाग नोंदविला आहे.
उदईक रोजी होणा-या ईद ए मिलादच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे दिनांक 25.08.2026 रोजी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकी करीता उपस्थित असलेले सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. ईद ए मिलादच्या अनुषंगाने आक्षेपार्ह बॅनर, पोस्टर अथवा गाणी लावण्यात येऊ नयेत पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे, डी.जे डॉल्बीचा वापर करण्यात येऊ नये वगैरे सूचना .सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग व कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी दिल्या आहेत.



