maharashtrapoliticalsocialsolapur

प्रभाग क्रमांक ७ च्या भाजप प्रचारात उमेदवारांचे कुटुंबीयही आघाडीवर

नागरिकांचाही मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद....

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ च्या भाजप उमेदवारांच्या प्रचारात उमेदवारांचे कुटुंबीयही आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाजप उमेदवार पद्माकर काळे यांची पत्नी प्रतिभा काळे, पुरुषोत्तम बरडे यांच्या स्नुषा आणि उमेदवार उत्तरा बरडे बचुटे यांच्या नणंद अर्चना बरडे, श्रध्दा पवार यांच्या सासु माजी नगरसेविका मंदाकिनी पवार, आनंद कोलारकर यांच्या पत्नी दुर्गा कोलारकर या प्रचारात आघाडीवर आहेत.

 

 

प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवारांच्या काकू, मामी, पत्नी, कन्या, सुना, सासुबाई, नणंद, भावजय, मेहुणी यांच्यासह आप्तेष्ट, भावकी व पाहुणे आदींसह कुटुंबातील सदस्यांची टीम होम टू होम प्रचार करत संपूर्ण प्रभाग पिंजून काढत आहेत.

 

 

 

त्यांच्या प्रचाराला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी उमेदवारांचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन देखील मतदार बंधू देत आहेत. उमेदवारांचे कुटुंबीय आणि आप्तेष्ट प्रचाराच्या मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकही पदयात्रा, कॉर्नर सभा, होम टू होम प्रचारात उत्साहाने सहभागी होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa