maharashtrapoliticalsocialsolapur

साथ दिलीत, विश्वास दिलात; संघर्षात एकटे सोडले नाहीत – हिच खरी ताकद : प्रभाग ७ मध्ये शिंदे, पिसे, सपाटेंचे बॅनर झळकले….

सोलापूर | प्रतिनिधी

 

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून, ही निवडणूक आता केवळ विजय-पराजयापुरती मर्यादित न राहता अस्तित्वाची लढाई ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.
“साथ दिलीत, विश्वास दिलात, संघर्षात एकटे सोडले नाहीत – हिच माझी खरी ताकद आहे,” या आशयाचे भावनिक आणि ठाम संदेश देणारे बॅनर प्रभाग ७ मधील विविध वस्त्यांमध्ये झळकू लागले असून, शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे.

 

 

प्रभागातील धरमशी लाईन, थोरला मंगळवेढा तालीम परिसर, अभिमान श्रीनगर, लोकमंगल शाळा परिसरासह इतर वस्त्यांमध्ये हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, युतीच्या उमेदवारांनी जनतेशी असलेले नाते, संघर्षातील साथ आणि विश्वास यावरच आपली राजकीय ताकद उभी केली असल्याचे दिसून येते.
या निवडणुकीत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, वस्ती विकास, आरोग्य सुविधा आणि युवकांचे प्रश्न हे कळीचे मुद्दे ठरत आहेत. उमेदवारांकडून घराघरात जाऊन थेट संवाद साधला जात असून, केवळ आश्वासनांपेक्षा कामाचा हिशोब आणि भविष्यातील ठोस विकास आराखडा मतदारांसमोर मांडला जात आहे.

 

स्थानिक नागरिकांमध्येही या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असून, “आमच्या अडचणीच्या काळात जे आमच्यासोबत उभे राहिले, त्यांनाच संधी द्यावी,” अशी भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभाग ७ मध्ये ही लढत विश्वास विरुद्ध दिखावा आणि जमिनीवर काम करणारे विरुद्ध फक्त घोषणा देणारे अशीच होत असल्याचे बोलले जात आहे.

 

 

दरम्यान, विरोधी उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार सुरू असला तरी, युतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद, वाढती गर्दी आणि झळकणारे बॅनर यामुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक वस्ती, प्रत्येक मतदार आणि प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याने सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

 

 

“जनतेचा विश्वास आणि संघर्षातील साथ हीच आमची खरी ताकद आहे. विकास, पारदर्शकता आणि प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त होत असून, प्रभाग क्रमांक ७ ची ही निवडणूक सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa