crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पोलीस उपनिरीक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचा विराट अकॅडमीतर्फे सत्कार

 

सोलापूर : प्रतिनिधी

अपार कष्टातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार स्वामी समर्थ स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत विराट अकॅडमीतर्फे करण्यात आला. नेहरूनगर शासकीय क्रीडांगणावर हा सत्कार झाला.

 

 

 

सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि प्रचंड मेहनत आणि अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या युवराज गवळी, योगेश्वर पांचाळ, हरीश गंगदे यांना फेटा बांधून, मिठाई भरवून याप्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.

 

 

 

 

यावेळी माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, उद्योजक व बिल्डर डेव्हलपर सतीश बुरुडकर, विराट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे, भारती लिंगडे, न्यू जॉगर्स असोसिएशनचे दिलीप कदम, हेमंत जाधव, संतोष कदम, निलेश वरवडकर, सुभाष माने, समाज कल्याण अधिकारी शांताराम शिंदे, भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठचे यशवंत पाथरूट तसेच विद्यार्थी, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button