solapur

राज्य शासनाच्या स्मशानभूमी समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांचा सहभाग

राज्य शासनाच्या स्मशानभूमी समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांचा सहभाग

ग्रामविकास व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रशासनाला निर्देश

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबई येथे झाली. या समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले.

राज्यातील स्मशानभूमींची सद्यस्थिती, त्यांचे अद्ययावतीकरण व परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत ही बैठक झाली. मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा व परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. अभ्यास समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्या आधारे निष्कर्ष काढून अहवाल सादर केला जाणार आहे.

राज्यात जिथेही विकासकामांची मागणी केली जाईल, त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. एक गाव एक स्मशानभूमी तयार करण्याचा शासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने विविध गावांचा अभ्यास करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्षलागवड, छत, आरसीसी बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, अप्रोच रोड/पोहच रस्ता तसेच महिला, पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

या बैठकीस मंत्री जयकुमार गोरे, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, आमदार देवेंद्र कोठे, अशोक राणे, ऋषिकेश सकनूर, ॲड. गुरदीप सिंह अहलुवालिया, श्रीमती अश्विनी चव्हाण, जयवंत तांबे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
—–
कोट

स्मशानभूमीची स्थिती सुधारण्यासाठी कार्यरत

राज्यातील स्मशानभूमींची स्थिती सुधारणे, नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाला उपाय सुचविण्यासाठी राज्याची स्मशानभूमी समिती कार्यरत आहे. याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हावा या हेतूने कामकाज करण्यात येत आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button