मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील जबरीचोरीचा गुन्हा उघडकीस एक महिला आरोपी अटक
एकूण 2,30,000 रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची दमदार कामगिरी
——————————————
या गुन्हयातील फिर्यादी हा सन 2024 मध्ये सोलापूर शहर आयुक्तालय कडील फौजदार चावडी, पोलीस ठाणे कडील सायबर फ्रॉडच्या गुन्हयामध्ये अटक झाल्याने तो सोलापूर जिल्हा कारागृहात होता. तेथे त्याची रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळया सुरेश पवार हा सुध्दा सोलापूर जिल्हा कारागृहात असल्याने त्या दोघांची कारागृहात ओळख झाली होती. त्या दोघांची चालू महिन्यात कारागृहातून जामीनावर सुटका झाल्यानंतर ते दोघे मोबाईल फोन वरुन एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्यान अजित उर्फ काळया सुरेश पवार रा. नंदूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर याने यातील फिर्यादीस वारंवार मोबाईलवरुन संपर्क साधून माझी सोलापूर जिल्हयात खूप मोठया प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे. त्यांना सांगून तुचे केसमधून नांव काढून टाकू तु मला भेटायला ये असे सांगितले होते.
त्यामुळे दिनांक 9/04/2026 रोजी यातील फिर्यादी सिक्वेरा व त्याचे सोबत एक महिला असे दोघेजण अजित उर्फ काळया पवार यास भेटण्यासाठी त्याने दिलेल्या लोकेशनप्रमाणे ते दोघेजण ब्रम्हपूरी शिवारातील हॉटेल उपसरपंच याचे पाठीमागे मुंढेवाडी जाणारे रोडवर निर्जनस्थळी आल्यानंतर अजित उर्फ काळया पवार व तिच्या सोबत असलेल्या लोकांनी फिर्यादी व त्याची मैत्रिण यांना शिवीगाळ व दमदाटी करुन त्यांचेजवळील *रोख रक्कम 2,50,000/- रु. व मैत्रिण याचे गळयातील एक सोन्याची चैन, फिर्यादी याचे गळयातील एक चांदीची चैन असा एकूण 3,05,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल* जबरदस्तीने काढून घेतले म्हणून ग्लेन पर्सी सिक्वेरा, वय 48 वर्षे, रा. कल्याण डोंबिवली जि. ठाणे यांनी फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुरनं 257/2026 बीएनएस 2023 चे कलम 309(4), 3(5) प्रमाणे* गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप ,यांना सदर गुन्हयाचे समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून त्यांना पकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करुन कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार संजय जगताप यांनी सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास योग्य त्या सुचना देवून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेश दिले होते.
दिनांक 14/04/2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक सदर गुन्हयाचे तपासकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माचणूर ता. मंगळवेढा या भागात हजर असताना, गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करतेवेळी अजित उर्फ काळया सुरेश पवार याचेबरोबर त्याचे पत्नी सुप्रिया अजित उर्फ काळया पवार हि सुध्दा असून ती सध्या त्याचे मौजे नंदूर येथील राहत्या घरी आली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, तेथे जावून सुप्रिया अजित उर्फ काळया पवार, वय 35 वर्षे, रा. नंदूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर* हि मिळून आल्याने, तिस ताब्यात घेवून तिच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता, तिने सांगितले की, सदर गुन्हयातील फिर्यादी याचेबरोबर माझे नव-याची जेलमध्ये ओळख झाली होती.
माझा नवरा अजित उर्फ काळया, मी स्वत:, व रणवीर मिरज ता. सांगली असे आम्ही तिघांनी मिळून यातील फिर्यादी यांना मोबाईल व्दारे संपर्क साधून त्यास त्याचे गुन्हयाचेकामी मदत करतो असे सांगून त्यांना बोलावून घेवून त्यांचेकडील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याचे सांगितले. या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी रोख 1,75,000 रु. व 50,000 /- रु. किंमतीची एक सोन्याची चैन, 5000/- रु. किंमतीची चांदीची चैन असा एकूण 2,30,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडून जप्त करण्यात आलेला आहे.या गुन्हयाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.
🛑 मंगळवेढा CR 257/2026 Us 309(4),3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी :-*
सुप्रिया अजित उर्फ काळया पवार, वय 35 वर्षे, रा. नंदूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर ( अटक आरोपी )
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतिष बुरकुल यांचे पथक व मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बनकर, श्रीकांत देवकते यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.



