crimemaharashtrapoliticalsocialsolapur

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई १२.५५ कोटींचा मुद्देमाल जप्त:- पोलिस अधीक्षक भाग्यश्री जाधव…

सोलापूर

 

राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे तसेच अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतूक यावर मोठी धडक कारवाई करत एकूण १२ कोटी ५५ लाख ८० हजार ६६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई सागर धोमकर, विभागीय उपायुक्त, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक  भाग्यश्री पं. जाधव व उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात करण्यात आली.

 

 

 

या कालावधीत विभागाने एकूण ११,५७,५७५ लिटर रसायन, ८७,०२२ लिटर हातभट्टी दारू, ६,७८३ ब. लिटर देशी मद्य, २,३३९ ब. लिटर विदेशी मद्य, ८८३.२६ ब. लिटर बिअर, ७,३०२ बल‍ि, ताडी १९,४०० बल‍ि असा मोठा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच एकूण ३,०५७ गुन्हे नोंदवून २,९८१ जणांवर कारवाई करण्यात आली असून ३३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सन २०२४-२५ च्या तुलनेत जप्त मुद्देमालात ४६.६६ टक्के वाढ झाली असून गुन्हे नोंदणीमध्ये १७.४४ टक्के वाढ झाली आहे. तसेच दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत २७९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ९६.६० लाख रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

 

 

 

अवैध मद्य विक्री व सेवनास परवानगी देणाऱ्या ५२५ ढाब्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाने ढाबा मालक व ग्राहकांकडून मिळून १३.३२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच अनुज्ञप्तीतील विसंगती संदर्भात ८९ प्रकरणांमध्ये २०.९५ लाख रुपयांचा दंड शासनजमा करण्यात आला आहे.
दरम्यान, सन २०२५-२६ साठी ५२६ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ५३४ कोटी रुपये महसूल जमा करून विभागाने १०२ टक्के उद्दिष्टपूर्तता साधली आहे.

 

ही संपूर्ण कारवाई निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सहाय्यक कर्मचारी व जवानांच्या संयुक्त पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अधीक्षक  भाग्यश्री जाधव यांनी सांगितले. तसेच अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button