आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये डोणगाव रस्त्यावरील सलगर वस्ती जवळील इंद्रप्रस्थ फेज तीन येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक सहा मधील इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात मुख्य रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत होती. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इंद्रप्रस्थ फेज तीन कडे जाणारा मुख्य रस्ता व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडे केली होती.
आमदार देवेंद्र कोठे यांनी या मागणीची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी निधी देऊन येथील रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी २८ लाख ७२ हजार रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नूतन नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका विजया खरात, महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, पवन खांडेकर आदी उपस्थित होते.



