crimeindia- worldmaharashtrapoliticalsocial

Speed news:- अवंती नगर येथील चैन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस विधी संघर्ष ग्रस्त बालकाकडून ५,५८,५८८ किमतीचा मुद्देमाल हस्तगत….

सोलापूर

 

फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०७/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०६.४५ वा. च्या सुमारास एका काळया रंगाचे पल्सर मोटारसायकलवर दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात्त येवून अवंती नगर, सोलापूर येथील मेडप्लस मेडीकल दुकानाचे समोर असलेले कॉर्नर, याठिकाणी फिर्यादी नाव विजयालक्ष्मी धोडीराम साबळे, वय ६६ वर्षे, व्यवसाय-गृहीणी, राहणार-घर नं. बी १५ अवंती नगर, जुना पुना नाका, मुरारजी पेठ सोलापूर या त्यांचे दोन मैत्रीणींसोबत पायी चालत जात असताना त्यांचे जवळ मोटारसायकल नेवुन ल्यांगे गळ्यातील दोन वाटया असलेले मणी मंगळसूत्र हे जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात निघुन गेले होते. सदरची मोटारसायकल ही काळया रंगाची पल्सर असुन त्यास दोन्ही बाजुस नंबर प्लेट नव्हते, या बाबत माहीती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुरनं. ३०८/२०२६ भा.न्या. संहिता, २०२३ चे कालम ३०४(२), ३(५) अन्वये दि.०७/०४/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनास्थळी सहा. पोलीस आयुक्त विभाग १, प्रताम मोमण, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव रावत यांनी भेट देवून सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन त्याच प्रमाणे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकातील सपोनि संजय क्षिरसागर व पथक यांना सदर गुन्हयाचा तपास करून आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.

 

 

या गुन्हयाचा तपास डी .बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर व पथक करत असताना तांत्रीक तपास घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळालेल्या माहीतीवरुन शोध घेत असता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना त्यांच्या बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन सलग ०२ दिवस रात्र आरोपीतांचा बीड येथे जावुन शोध घेतला असता सदर गुन्हा केलेल ०२ विधीसंघर्षग्रस्त बालक हे मिळून आले. त्या विधीसंघर्षग्रस्त बालकांचे पालक यांच्या समक्ष चौकशी करता विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी व्यसनासाठी पैसे नसल्याने मौजमजा करण्यासाठी व व्यसनासाठी काळया रंगाचे पाल्सर मोटारसायकलवर सोलापूर मध्ये येवुन सदर गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांनी सदर गुन्हयात फिर्यादी पांची जबरी चोरी केलेले ३३ ग्रॅम सोन्याचे मगी मंगळसुत्र हजर केले. तरी सदर गुन्हयामध्ये गुन्हयात वापरलेली काळया रंगाची पल्सर २२० मोटारसायकल, तसेच दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असे एकूण ५,५८,५८८/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तमत्त करण्यात आला आहे.

 

 

 

 

अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय क्षिरसागर व पथकाने दोन दिवस रात्र सतत व कौशल्यपूर्ण तपास करुन पायी चालत जाणा-या फिर्यादी महिलेचे गळयातील दोन अनोळखी मोटारसायकलस्वार यांनी जबरदस्तीने चोरी केलेले सोन्याचे मणी मंगळसुत्र परत मिळवुन देवुन चैन स्नैचोंगचा गुन्हा उघड केला माणी पोलीसांबददल त्याचे मनात आत्मविश्वास निर्माण करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार सो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत, दुय्यम पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/बसवेश्वर परीट, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/विनोद व्हटकर, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकों/कृष्णा बडुरे, पोको सुरज सोनवलकर, पोकों/अमोल खरटमल, पोर्को शशिकांत दराडे, पोको अयाज बागलकोटे, पोकॉ अजय चव्हाण, पोको/बिनायक जाधव, पोकों/पंकज घाडगे, पोकी/सुधाकर माने, पोकों/रवी धेंडे, पोकों/अतिश पाटील पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकों/नितीन मोरे, पोकों/तौसीफ शेख यांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button