अनुजाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या हॉस्पिटलची सनद रद्द करा
पोलीस आयुक्त व सिविल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर
सिझेरियन झालेल्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केल्यामुळे अनुजा बावळे हिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात दबडे यांची चूक आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि माझ्या पत्नीला न्याय मिळावा. डॉ. दबडे आणि स्टाफ यांच्यावर कारवाई होऊन त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे अनुजाचे पती विनायक बावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पत्नी अनुजा सनी बावळे हिला प्रेग्नेंसी उपचारासाठी पहिल्या महिन्यापासून माधुरी दबडे कृष्णामाई हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखवले होते. दरवेळी पेशंट फॉलोअपसाठी दाखविले असता ती व्यवस्थित आहे, असे सांगितले होते. सातव्या महिन्यापासून पाणी कमी आहे असे सांगितले. त्यासाठी उपचार चालू होते. 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रेड डिस्चार्ज म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट केले. थोडा बॅकपेन होता साधारण 6 वाजता मॅडमने पाणी कमी असल्याने सिझेरियन आणि जेल ट्रीटमेंटचा पर्याय सांगितला आम्ही विचारपूर्वक सिझेरियन करण्यास सांगितले. संध्याकाळी 7: 15 वाजता सिझेरियन होऊन मुलगा झाल्याचे सांगितले. साधारण रात्री 8:15 वाजता बाळाला आमच्याकडे देण्यात आले. रात्री 9 वाजता पेशंटला वार्डमध्ये शिफ्ट केले, त्यानंतर पहाटे 3:30 वाजेपर्यंत मॅडम एकदाही पेशंटकडे आल्या नाही. त्यावेळी पेशंट नॉर्मल होता बीपी, पल्सरेट, नॉर्मल होता. पेशंट रात्री 12 वाजेपर्यंत व्यवस्थित होता, त्यानंतर पेशंट मला कसं तरी होतंय, असे सांगून कन्हु लागला.

अनुजाचे नातेवाईक
पेशंटच्या नातेवाईकांनी सिस्टर कडे तक्रार केली मॅडमला बोलवा असे सांगितले, तरी त्यांनी त्रास होत असतो, कमी होते. असे सांगितले. परत रात्री 1 वाजता सिस्टरकडे तक्रार केली, तरी त्यांनी बोलवले नाही. आणि रक्तस्त्राव कमी होण्यासाठी गोळी ठेवली. पेशंट वारंवार कण्हत होता, तरी लक्ष दिले नाही. साधारण रात्री 2 वाजता पॅड बदलण्यास सांगितले त्यावेळी मावशीने पॅड बदलला, आणि सिस्टरने बीपी मशीन, पल्स चेक मशीन काढली पहाटे 3 नंतर पेशंट मला डोळ्यास काही दिसत नाही, मला काय होत आहे ते समजेना असे सांगून जोरात कन्हु लागला होता, हातपाय झाडू लागला.
नातेवाईकांना फोन केला तेव्हा सिस्टरने मॅडमला फोन केला तोपर्यंत पेशंटनी सलाईन काढून टाकले, आणि अनकॉशस झाल्या. मॅडमने आल्या नंतर काय झाले? कसे झाले ? असे विचारले आणि पेशंटला ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला हार्ट पंपिंग केले, आणि हृदयाचे ठोके कमी असल्याने अश्विनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू असे पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले. अश्विनी हॉस्पिटलला शिफ्ट करताना कोणताही डॉक्टर किंवा स्टाफ आमच्या सोबत नव्हता. ऑक्सिजनची सोय नव्हती, नाइट इन्चार्ज किंवा डॉक्टर न्हवते. अश्विनी हॉस्पिटलमध्ये साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर आम्हाला सांगण्यात आले की, पेशंट कोणत्याही उपचारास प्रतिसाद देत नाही.
कृष्णामाई हॉस्पिटलमधील माधुरी दबडे व इतर स्टाफ यांच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे अनुजा बावळे हिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात दबडे यांची चूक आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि माझ्या पत्नीला न्याय मिळावा. माझ्यासोबत जे घडले आहे. ते इतरांसोबत होऊ नये, असे मला वाटते. माधुरी दबडे आणि स्टाफ यांच्यावर कारवाई होऊन त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे मयत अनुजा बावळे हिचे पती विनायक बावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



