maharashtrapoliticalsocialsolapur
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेनेकडून अभिवादन….

सोलापूर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना सोलापूर शहर-जिल्हाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपतींच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री, संजय सरवदे, तालुकाप्रमुख राजकुमार शिंदे, उपशहरप्रमुख अयुब पठाण, कुणाल दिक्षित, अमोल कदम, समीर मुजावर, अमीर मुजावर, शिवकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम श्रद्धा व उत्साहात पार पडला.



