india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर

कार्याध्यक्षपदी विजय कुलथे : महात्मा बसवेश्वरांची जयंतीनिमित्त राबविणार समाजोपयोगी कार्यक्रम

 

सोलापूर : प्रतिनिधी

मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात आली. महामंडळाची बैठक शनिवारी सायंकाळी वीरशैव भवन कार्यालय येथे झाली.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी
मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी रेवणसिद्ध आवजे, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सुदीप चाकोते, सिद्धेश थोबडे, माजी अध्यक्ष राजाभाऊ आलुरे,
सचिन शिवशक्ती, आनंद मुस्तारे, प्रिया बसवंती, विजयकुमार बमगुंडे, प्राचार्य विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, बसवराज बगले, गौरव जक्कापुरे, मनोज कलशेट्टी, गिरीश मंद्रूपकर, राम वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

 

महामंडळाचे नूतन अध्यक्ष शरणराज केंगनाळकर म्हणाले, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या प्रमाणावर व्हावी याकरिता महामंडळाकडून यंदा अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जयंती उत्सवात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून सोलापूरकरांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही नूतन अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी याप्रसंगी केले.

 

 

 

 

नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे म्हणाले, महात्मा बसवेश्वर महाराजांचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची वेळ रात्री १२ पर्यंत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे यांनी सांगितले. ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर आनंद मुस्तारे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button