जिल्हा परिषदेत भाजपच्या यशानंतर पालकमंत्र्यांचा वानकर बंधूनी केला विशेष….

सोलापूर (प्रतिनिधी) :
सोलापूर व सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वानकर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रभावी नियोजनामुळे दोन्ही जिल्ह्यांत भाजपला मोठे यश मिळाले असून, प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवण्यात पक्षाला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक गणेश वानकर यांनी गोरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पालकमंत्री गोरे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. प्रसंगी युवा नेते दत्तात्रय वानकर, विठ्ठल वानकर, प्रसाद गायकवाड, रेवन पुराणिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गणेश वानकर म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सोलापूर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातील असले तरी त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले असून, स्थानिकांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण केली आहे.



