श्रीराम नवमी उत्सवासाठी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची उत्सवाध्यक्षपदी एकमताने निवड….

सोलापूर
श्रीराम जन्मोत्सव सोलापूर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्रीराम नवमी उत्सव २०२६–२०२७ साठी उत्सवाध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश रा. कोठे यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी भूषविले.
या बैठकीस सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत, नगरसेवक बिज्जू आण्णा प्रधाने, रवि काका बंडे, अॅड. दत्ता पवार, मदनजी मोरे, मराठा महासंघाचे दास काका शेळके, नगरसेवक शिवराज गायकवाड, रवी कोटमळे, सागर मोरे, राजाभाऊ निकम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उत्सवासाठी खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
उत्सवाध्यक्ष – डॉ. सूर्यप्रकाश कोठे
उपाध्यक्ष – हरी जाधव, रोहन मराठे, समर्थ नावडे
कार्याध्यक्ष – जितेश मासे
सहकार्याध्यक्ष – जयसिंग कैयावाले
सचिव – निशांत साबळे
सहसचिव – दिनेश चाबुकस्वार, सिद्धू मडगे, विनोद गायकवाड
खजिनदार – प्रवीण गलांडे
सेक्रेटरी – शुभम कराळे
प्रसिद्धी प्रमुख – रोहित माशाळकर, आदित्य फडतरे
यावेळी उत्सवाध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी श्रीराम भक्तांसाठी विशेष उपक्रम जाहीर केला.
त्यांच्या वतीने शहरातील विविध मंडळांना ५१ प्रभू श्रीरामांच्या मूर्ती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांनी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या इतिहासाबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीरामभक्त रवी कोटमळे यांनी हिंदुत्वाचे विचार मांडले. येत्या श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना यतीराज होनमाने यांनी केली. नवनिर्वाचित उत्सवाध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल व समाजसेवेची कामे अधिक प्रभावीपणे केली जातील, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, उपाध्यक्ष संजय सालुके, सचिव समर्थ बंडे, खजिनदार संदीप जाधव, सहसचिव शिवराज दादा गायकवाड, सल्लागार अमित राऊत तसेच सदस्य प्रसाद झेडंगे, प्रशांत पवार, संस्कार नरोटे, अर्जुन मोहिते, सुरज भोसले, लतेश हिरवे, कृष्णा जाधव, रुपेश बेलेराव, सुमित कोष्टी, सुहास चव्हाण आदींच्या सहकार्याने बैठक यशस्वी झाली.



