युवकाचा खून केल्याप्रकरणी मूर्ती कारासह सहा जणांची निर्दोष मुक्तता

सोलापूर
:- विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोझा वय 32 रा नवीन वेडी घरकुल सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी मूर्तिकार 1) नागेश दत्तात्र लगशेट्टी , वय 46, 2) भूपती उर्फ गोट्या अरुण नारा वय 24, 3) रमेश उर्फ शाम मल्लेश्याम गुंतुक वय 24, 4) अमोल दिगंबर संदूपटला वय 24, 5) गणेश काशिनाथ गडगी, 6) संतोष उर्फ सनी श्रीनिवास मरगम सर्व राहणार विडी घरकुल सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन त्यांनी पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, यातील आरोपी नागेश लगशेट्टी हा गणेश मूर्तीचा व्यापारी होता. मयत विनायक हा गणेश मूर्तीचे साचे बनविण्याचे काम करत होता. मयत गणेश याने आरोपी नागेश याचे कडून हात उसने पैसे घेतले होते ते त्याने दिले नव्हते, त्या कारणावरून आरोपी नागेश याने इतर आरोपींशी संगणमत करून विनायक खून करण्याचा कट रचला. दि:- 20/4/2024 रोजी विनायक हा त्याच्या गाडीवरून घरी जात असताना स्वराज्य तरुण मित्र मंडळ समोर मैदानात विनायक यास अडवून आरोपींनी धारदार हत्याराने वार केले व त्यास गाडीवर बसून क्रांती चौक भाजी मंडई येथे रस्त्यावर टाकले टाकले व त्याच्या डोक्यावर सिमेंटचा ठोकळा घालून खून केला , त्यावरून मताची आई राधाबाई बाळकृष्ण बोजा हिने वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांचे विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणी वेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, प्रत्यक्षदर्शी आरोपींना ओळखणारा कोणताही साक्षीदार नसून कट रचून खून केला हे सरकारी पक्षाने शाबित केले नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केले.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. मनोज पामुल, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले.



