Businessmaharashtrapoliticalsocialsolapur

जागतिक रेडिओ दिनानिमित्त भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलची ज्ञानवर्धक शैक्षणिक सहलीचे आयोजन…

सोलापूर

 

 

जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रल तर्फे आकाशवाणी सोलापूर येथे अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही रेडिओचे असलेले महत्त्व आणि समाजजागृतीतील त्याची भूमिका समजून घेण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता.सहलीदरम्यान सदस्यांना रेडिओ केंद्राच्या संपूर्ण कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमांची संकल्पना कशी तयार होते, त्याचे लेखन, ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग), संपादन, तांत्रिक तपासणी आणि शेवटी श्रोत्यांपर्यंत होणारे थेट (लाईव्ह) प्रसारण या सर्व प्रक्रियेचे प्रत्यक्ष दर्शन घडले. लाईव्ह अनाऊन्समेंट करताना आवश्यक असलेली एकाग्रता, वेळेचे अचूक नियोजन आणि तांत्रिक टीमचे समन्वय याचा अनुभव सदस्यांना जवळून घेता आला.

 

 

स्टुडिओमधील शांतता, ‘On Air’ दिवा लागल्यावर निर्माण होणारे वातावरण आणि प्रत्येक सेकंदाचे असलेले महत्त्व हे सर्व सदस्यांसाठी एक वेगळाच अनुभव ठरला.
यावेळी केंद्राच्या सहाय्यक संचालक ढेरे मॅडम यांनी रेडिओच्या इतिहासाबरोबरच बदलत्या काळानुसार झालेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी प्रसारण कक्ष, नियंत्रण कक्ष (Control Room) आणि रेकॉर्डिंग स्टुडिओची पाहणी केली.रेडिओ दिनानिमित्त ढेरे मॅडम यांचा अध्यक्ष सुशील महिंद्रकर सचिव सागर पुकाळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सन्मान म्हणजे रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा क्षण होता.

 

 

 

या प्रसंगी सुशील महिंद्रकर, प्रकाश भांबुरे, सागर पुकाळे, रविकिरण वायचळ, सुहास क्षीरसागर, सौ. माधुरी लोकरे, सौ. दीपा उपरे, श्री. किरण पुकाळे आदी सदस्य उपस्थित होते. शेवटी प्रकाश भांबुरे यांनी आकाशवाणी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानत, ही सहल ज्ञानसमृद्ध करणारी ठरल्याचे नमूद केले.

ही शैक्षणिक भेट केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, सदस्यांच्या ज्ञानात भर घालणारी, संवाद माध्यमांविषयी आदर निर्माण करणारी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करणारी ठरली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button