Businessindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे…

इलेक्ट्राे 2026 प्रदर्शनाचे थाटात उदघाटन....

सोलापूर

, दि. 12/02/2026

इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले.सोलापूरचे जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रो 2026 प्रदर्शनाचा फायदा घ्यावा,असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले. या प्रदर्शनात प्रतिवर्षी 50 कोटींची उलाढाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांनी कंपनीचे लॉन्च सोलापुरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पी प्लस च्या माध्यमातून भारतीय बनावटीचे उत्पादन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञानाचे प्रॉडक्ट देत असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट केले.
साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स, टेलिकम्युनिकेशन, हाेम अ‍ॅप्लायन्सेस, साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे 2026’’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 12 फेब्रुवारी राेजी व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री. संदीप पाटील यांच्या शुभहस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दि. 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले.

 

 

 

 

 

 

आहे. यंदा इलेक्ट्राे प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायाेजक असून वीझी टीव्ही, हाईफा इलेक्टिकल, अपार इलेक्ट्रिकल्स्, लक्ष्मी ऑटोमोबाइल्स , एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, बजाज फायनान्स व सॅटीसफाय मिडीया हे सह प्रायाेजक आहेत.
अध्यक्ष श्री. सुरजरतन धुत प्रास्ताविक करताना म्हणाले की, इलेक्ट्राे 2026 चे हे 26 वे वर्ष असून 25 वर्षापूर्वी 27 स्टाॅल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टाॅलचे झाले आहे. आतापर्यंत इलेक्ट्राेने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे, असे श्री. धुत यांनी सांगितले. या वर्षी जवळपास एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

 

 

द्वीप प्रज्वलन करताना आयुक्त , शेजारी डावीकडून गिरीश मुंदडा, हरीश कुकरेजा, बाबू चव्हाण, सूरज रतन धूत, संदीप पाटील, आनंद येमूळ, भूषण भुतडा, सुयोग कालानी

 

इलेक्ट्राे चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखविला. काही स्टाॅल्स् सामाजिक संघटनांना विनामुल्य देण्यात आले आहेत.या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दरराेज लकी ड्राॅद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्राॅमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घाेषणा करण्यात आली.
प्रारंभी व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री. संदीप पाटील व महापालिका आयुक्त डाॅ. सचिन ओंबासे यांच्या शुभहस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले. व्ही प्लस कंपनीचे सुशील कुमार देशमुख व प्रफुल्ल देशमुख असेच महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

 

7 दिवस चालनाऱ्या इलेक्ट्राे 2026 दरराेज दु. 4 ते रा. 9.30 व रविवारी स.11 ते रा. 9.30 पर्यंत , या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी,फ्रिज , साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वाॅशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्राेव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, साेलर सिस्टीम, गॅस गिझर, माेबाईल, आय पॅड,टेलीफोन , हेल्थ इक्वीपमेंट, काॅम्प्युटर इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. अशा या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुध्द पिण्याचे पाणीची साेय केलेली आहे. सर्व स्टाॅल मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरीता दरराेज रक्तदान शिबीराचेही आयाेजन करण्यात आले असून अवयव दान विषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती सचिव हरीष कुकरेजा यांनी दिली.तसेच प्रदर्शनास भेट देऊन रिल्स बनवून पाठविण्यांसाठीही स्पर्धा आयाेजित केली असल्याची सांग्णयात आली.

 

 

 

 

सचिव हरीष कुकरेजा यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष भुषण भुतडा यांनी आभार मानले . सुत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केले.
यावेळी सुमित रामाणि, अतिफ खान पराग पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सह सचिव श्री.गिरीश मुंदडा, खजिनदार श्री. सुयाेग कालाणी , संचालक सर्वश्री चंद्रकांत शाहपुरे, रवि पाचलग, संजय नाईक, राजेंद्र बिराजदार, बसवराज नवले, आनंद येमुल, विजय टेके , सुनिल भांजे,सचिन करवा व संस्थेचे माजी अध्यक्ष सतिश मालू, केतन शाह, विपीन कुलकर्णी , दिपक मुनाेत, काैशिक शाह , खुशाल देढीया, पवन मुंदडा, दत्तात्रय अंबुरे, जाॅय छाबरिया, यल्लपा भाेसले, गणेश सुत्रावे, संदेश काेठारी, राजेश जाजु बसवराज कडगंची, आदी उपस्थित हाेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button