बी टू मधील कामगारांच्या जागा शासनाकडून विनामूल्य नावावर करून देणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : नागरिकांचा भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प...

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर बी टू मधील कामगारांच्या जागा शासनाकडून विनामूल्य नावावर कामगारांच्या नावावर करून देणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १५ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अंबादास करगुळे, विजया खरात, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा आणि कॉर्नर सभेप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उमेदवार अंबादास करगुळे, विजया खरात, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे आदी उपस्थित होते.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बी टू मध्ये असलेल्या कामगार चाळींमधील जागा कामगारांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सूचना दिली होती. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तातडीने याबाबत शासकीय स्तरावर बैठक लावून हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १५ येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जुनी मिल आयोजित केलेल्या सभतून आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करून प्रभागात असलेल्या जुनी मिल चाळ, लक्ष्मी चाळ, पाटील चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, वारद चाळ, एनजी मिल चाळ,जुनी पोलीस लाईन, धरमशी लाईन यासह मुरारजी पेठ येथील अन्य कामगारांच्या चाळी व मिळकतींवरती चुकीच्या प्रकारे बी टू (सत्ता प्रकार ब) लागल्यामुळे कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आचारसंहितेनंतर तातडीने बैठक लावून हा विषय एकही रुपये शासकीय कर न घेता पूर्णपणे निकाली काढून देण्याचा शब्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेमध्ये दिला. यावेळी नागरिकांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून प्रतिसाद दिला.



