maharashtrapoliticalsocialsolapur

अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. विद्यासागर आगसे यांचा सत्कार …

अक्कलकोट काॅलेजमधील निवृत्त प्रा. आगसे यांचा सत्कार...

.

 

सोलापूर-

अक्कलकोट महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. विद्यासागर आगसे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त निवृत्त प्राचार्य एम. ए. शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे माजी विद्यार्थी व आगसे परिवारातर्फे गोविंदश्री मंगल कार्यालयात प्रा. आगसे व पत्नी वीरश्री आगसे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 

प्रारंभी आर्य समाज पद्धतीने यज्ञ करण्यात आला. विनय आगसे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य शेख, निवृत्त प्राचार्य एस. सी आडवितोट, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त बी. बी. राठोड, सी. के. शेका, डाॅ. चंद्रकांत जवळी यांची भाषणे झाली. विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. आगसे यांनी सत्कारास उत्तर दिले.

 

सौ. स्नेहा उदनूर यांनी आभार मानले. प्रा. प्रकाश सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास नातलग, विद्यार्थी, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button