india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवारांचा होम टू होम प्रचार ! सत्ताधारी भाजप सोबत जाण्याच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत…

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –

 

 

 

प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप जनता पार्टीचे उमेदवार सोनाली गायकवाड,सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांनी सोमवारी होम टू होम प्रचाराद्वारे नागरिकांशी संवाद साधला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सोबत चारही उमेदवार गेल्यामुळे प्रभागाच्या विकासाला गती मिळणार असून प्रभाग क्रमांक सहा मधील जनता सोबत राहणार असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. गडदर्शन सोसायटी, गवळी वस्ती, प्रियदर्शनी अपार्टमेंट तसेच सायंकाळच्या सत्रात बांधवस्ती परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी मतदारांकडून भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
होम टू होम प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह विविध अडचणी भाजपाचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांना सांगितल्या.

 

 

 

सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांच्या अडचणी येणार नाहीत.इतकेच नव्हे तर प्रभाग क्रमांक ६ विकासाचे एक मॉडेल म्हणून सोलापूर शहरात नावारुपाला येईल असा विश्वास गणेश वानकर यांनी व्यक्त केला.

 

 

याप्रसंगी प्रभाग क्रमांक ६ च्या भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे, माजी नगरसेविका सुनीता कारंडे,महादेव गवळी, बाळासाहेब घुले, वामन वाघचौरे,संदीप काशीद, वैभव जगताप, सुरज काशीद, औदुंबर जगताप, नारायण बचुटे, सुनील कदम, शेखर कवठेकर,बसवेश्वर नवले, किरण वाघमोडे, लखन कारंडे, जयप्रकाश मंठाळकर, संतोष मोरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button