डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण : आरोपी मनिषा माने-मुसळे हीचा मोबाईल परत मिळणेचा अर्ज मा. न्यायालयाने फेटाळला:- जिल्हा सरकारी वकील अॅड डॉ. राजपूत

सोलापूर
यात हकीकत अशी की, सदर प्रकरणातील महिला आरोपी मनिषा महेश माने मुसळे ही यातील मयत डॉ. शिरिष वळसंगकर यांचे हॉस्पीटलमध्ये सन २००८ पासून कामास होती तसेच तिच्याकडे हॉस्पीटलचे सर्व व्यवस्थापन सांभाळण्याचे काम होते. दि. १७/०४/२०२५ रोजी दुपारी ४.०७ वाजता यातील आरोपी मनिषा महेश माने ऊर्फ मुसळे हीने तिचा ई मेल आयडीवरुन फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांचे वडिल मयत डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या ई मेल आयडीवर मेल पाठविला व त्याची प्रत डॉ. अश्विन वळसंगकर यांच्या ई मेल आयडीवर ” आपणाकडून होत असलेल्या त्रासाच्या बाबतीत” या विषयाचे पत्र पाठविले. त्या मेलद्वारे पाठविलेल्या पत्रामध्ये आम्ही आरोपी मनिषा महेश-माने मुसळे हीचे अधिकार कापले आहेत, तिचा पगार कमी केला आहे. “मी दोन्ही मुलांना मारणार आणि इथे हॉस्पीटलमध्ये येऊन पेटवून घेणार आणि त्याला सर्वस्वी जबाबदार माझ्याबद्दल चुकीचे आणि खोटे पसरविले ते स्फाटमधील लोक आणि वळसंगकर कुटुंबिय जबाबदार राहाल.
असा धमकी दिलेला मजकुर आरोपी मनिषा हिने पाठविला होता. आरोपी मनिषा महेश माने ऊर्फ मुसळे हिने केलेल्या खोटया घाणरेडा आरोपांमुळे व्यथित होवून मयत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी “ज्या माणसांला मी शिकवून आज A.O मुसळे केले आहे आणि चांगला पगार देतो आहे तिने खोटारडे आणि घाणरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतिव दुख आहे म्हणून मी माझे जीवन संपत आहे” असे लिहून त्याखाली मयत डॉ. शिरीष वळसंगर यांनी शिरीष अशी मराठीत स्वाक्षरी केलेली चिठठी लिहून स्वतच्या बेडरूमला अटाच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतचे परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशिलामध्ये गोळी घालून घेवून आत्महत्या करण्यास प्रवत्त असल्याने यातील आरोपी मनिषा महेश माने ऊर्फ मुसळे हिने भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा केल्याचे तोहमत झाले असल्याने दि. १९/४/२०२५ रोजी यातील आरोपी मनिषा माने मुसळे हिला अटक करण्यात आली.
त्यावेळी अटक पंचनामा तयार करताना तिच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल सीमकार्डसह जप्त करण्यात आला होता व तो मोबाईल गुन्हयाच्या तपासकामी न्यायालयात हजर करण्यात आला. सदर मोबाईल व सीकार्ड हे मनिषा माने-मुसळे हिला परत मिळावे यासाठी दि.०२/०७/२०२५ रोजी तीने मा. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर मा. न्यायालयाने पोलीस प्रशासनाचे म्हणणे मागविले तसेच सदर प्रकरणात म्हणणे सादर करत असताना सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड डॉ. राजपूत यांनी तीव्र हरकत घेवून म्हणणे सादर केले. युक्तिवाद करतेवेळी आरोपीने मा. न्यायालयास विनंती केली की, सदर मोबाईल हा अटी व शर्तीवर परत आरोपीस मिळावा अशी विनंती केली.
यावर सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करतेवेळी अॅड डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास बाबी आणून दिल्या दिल्या की, हा मोबाईल आरोपीकडून पंचनाम्याद्वारे गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आला. तसेच सदर मोबाईल हा आरोपीच्या मालकीचा आहे. या संदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा मा. न्यायालयामध्ये आरोपी याने सादर केलेला नाही. परिणामी, जप्त केलेला मोबाईल आरोपीच्या स्वाधीन करता येणार नाही. यदाकदाचित मा. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला तर यातील आरोपी हा महत्वाचा पुरावा नष्ट करु शकते, त्यात बदल घडवू शकते.या बाबींचा विचार करुन मा. न्यायालयाने आरोपी मनिषा-मुसळे हीचा मुद्देमाल परत मिळण्यासाठीचा अर्ज नामंजूर केला.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. पी. पी. नवगिरे यांनी काम पाहिले.



