काँग्रेस पक्षाच्या श्रुतिका तुप्पत माजी नगरसेविका नंदा कांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

सोलापूर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास काही दिवस बाकी असतानाच सर्वाधिक इच्छुक असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे सर्वांचाच ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. सोलापूर महानगपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका नंदा कांगरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच सोललापुरातील युवती काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुतिका तुप्पद यांनी काँग्रेस पक्षाला धक्का देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

श्रुतिका या काँग्रेसचे माजी नगरसेवक स्वर्गीय श्रीशैल तुप्पद यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी भवनात शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते कामगार व तुप्पद यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घालून त्यांना पक्षात अधिकृत प्रवेश देण्यात आला. यावेळी अल्पसंख्याकचे वासिम बुऱ्हाण ,प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे,युवकचे अध्यक्ष सुहास कदम ,सादिक पटेल,दत्ता बडगंची उपस्थित होते.
=====================



