maharashtrapoliticalsocialsolapur

एज ग्रुप नॅशनल मधील गोल्डन हॅट्रिक नंतर श्रावणी ने सिनियर नॅशनल मध्ये पटकाविले २ गोल्ड मेडल….

सोलापूर

दि. १३ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान अहमदाबाद येथील वीर सावस्कर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या ७८ व्या सिनियर नेशनल अक्वेटिक चॅम्पियनशिप २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत, पहिल्या दिवशी सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात ३ मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये १८६.५० गुणासह पहिल्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे, तर तिसऱ्या दिवशी झालेल्या हायबोर्ड मध्ये १८१.४५ गुणासह दुसऱ्या सुवर्ण पदकाची ती मानकरी ठरली.

अशाप्रकारे श्रावणी ने एकूण ५ सुवर्ण पदके राष्ट्रीय स्पर्धेत मिळवली असून, यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे, कुंजकिशोर मेलेम, अतुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल इंटरनॅशनल रेफरी व जज्ज श्री. मयूर व्यास सरानी तिचे कौतुक करून शुभाशिर्वाद दिले आहेत.

स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर, विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक श्री बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत….

भव्य उद्घाटन भव्य उद्घाटन भव्य उद्घाटन 

स्वप्न पाहिले श्रमिकांनी, स्वप्नपूर्ती केली विजय मालकांनी

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सदानिका लोकार्पण सोहळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा लाडके भाऊ मा. ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते रविवारी १७ ऑगस्ट रोजी जल्लोषात उद्घाटन….

स्थळ :- राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्प गट नंबर १२/२ बक्षी हिप्परगा रोड दहिटणे सोलापूर

वेळ:- सकाळी ठीक ९ वाजता 

या कार्यक्रमास राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…

                            विनित

श्री .सुरेश बिराजदार.             आण्णाराव कानडे 

{ चेअरमन }                             { सचिव }

                             

राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.दहिटणे सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button