देवदर्शनासाठी पत्नीला घेऊन निघाला पत्नी समवेत शेवटची सेल्फी काढली आणि नंतर रस्त्यावरच पत्नी सोबत भांडण झाल्याने चाकूने सपासप वार करून पती सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला….
फौजदार चावडी पोलिसांनी आरोपीस शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या केले स्वाधीन...

यात
थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक ०६/०६/२०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय ३३ वर्षे { आर्मी भगौडा} हनुमान नगर शिरोली एम.आय. डी.सी कोल्हापूर मूळ राहणार कलबुर्गी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आला . व त्याने सांगितले की नमूद राहत्या पत्यावर शिरोली एम.आय. डी.सी कोल्हापूर मूळ राहणार कलबुर्गी तालुका जमखंडी सचिन चंद्रशेखर राजपूत याने त्याची पत्नी शुभांगी वय २८ वर्षे हिच्यावर चाकूने वार करून खून करून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याचे पोलिसांना सांगितले .
घटनेची माहिती मिळताच ठाणे अंमलदार महिला पोलिस हवालदार शेळके , व मदतनीस पोलिस शिपाई कुंभार यांनी शिरोली एम. आय.डी .सी पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना कळविली . घटनेची माहिती मिळताच शिरोली एम. आय डी सी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी गेले असता घर कुलूप बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. बंद घराचे पोलिसांनी कुलूप तोडले घरात काहीएक संशयास्पद आढळले नाही .
त्यानंतर फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राधा जेऊघाले यांनी सहाय्यक फौजदार जाधव व पोलिस शिपाई रोणे यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात स्वतः हून हजर झालेला आरोपी चंद्रशेखर राजपूत याच्याकडे घटनेच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की दिनांक ५/०६/२०२५ रोजी दुपारनंतर तो मोटार सायकल वरून त्याच्या पत्नीस देवदर्शनासाठी ज्योतिबा मंदिर येथे घेऊन जात असताना पत्नी शुभांगी यांच्या सोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने कोडोली ते ज्योतिबा मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावरील घाटात निर्जन स्थळी नेऊन पत्नीवर चाकूने वार करून शुभांगी या बेशुद्ध पडल्यानंतर घटना स्थळावरून पळ काढला .

आरोपी चंद्रशेखर राजपूत
पोलिस उप निरीक्षक राधा जेऊघाले यांनी या घटनेची माहिती तत्काळ शिरोळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व पोलिस पथक यांनी घटनास्थळी परिसरात जाऊन शोध घेतला असता मुख्य रस्त्या पासून आतमध्ये निर्जन स्थळी महिलेचा मृतदेह आढळून आला.त्यावरून सचिन चंद्र शेखर राजपूत याने खून केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याला पोलिसांनी निगराणी खाली ठेवले .
व शिरोली पोलिस ठाण्याचे पथक सोलापुरात आल्यानंतर त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपआयुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग १ प्रताप पोमण, यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, पोलिस उप निरीक्षक राधा जेऊघाले, सहाय्यक फौजदार विद्यासागर जाधव , महिला पोलिस हवालदार अर्चना शेळके , पोलिस शिपाई राहुल कुंभार , पो.शि हरीष रोणे यांनी यशस्वीपणे पार पाडली…



