maharashtrapoliticalsocialsolapur

गवळी‎ समाज‎ सांस्कृतिक‎ भवनाच्या स्लॅब‎ टाकणीचा भव्य शुभारंभ;‎ ५० लाखांच्या निधीमुळे समाजाच्या विकासाला मिळणार‎ गती…

 

 

सोलापूर

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय‎ अध्यक्ष व राज्याचे‎ उपमुख्यमंत्री अजित‎ पवार‎ यांच्या विशेष निधीतून‎ आणि‎ प्रदेशाध्यक्ष तथा‎ खासदार‎ सुनील‎ तटकरे यांच्या पाठबळातून मोदी‎ खाना परिसरात गवळी समाज‎ सांस्कृतिक भवन उभारणीसाठी‎ मंजूर झालेल्या‎ ५०‎ लाख‎ रुपयांच्या‎ निधीअंतर्गत स्लॅब‎ टाकण्याच्या‎ कामाचा‎ भव्य शुभारंभ‎ उत्साहात‎ संपन्न झाला.या‎ महत्त्वाकांक्षी‎ प्रकल्पासाठी‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन‎ जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक‎ नागेश‎ गायकवाड यांनी‎ विशेष पुढाकार‎ घेत सातत्याने पाठपुरावा केला.‎ गवळी समाजाच्या सर्वांगीण‎ विकासासाठी आम्ही‎ कटिबद्ध असून समाजाच्या विविध अडचणी दूर‎ करण्यासाठी‎ अजित‎ पवार आणि सुनील तटकरे‎ यांच्या माध्यमातून‎ पुढील‎ काळातही‎ प्रयत्नशील राहू,‎ असे आश्वासन किसन‎ जाधव‎ यांनी यावेळी दिले.

शुभारंभ प्रसंगी गवळी‎ समाजाचे अध्यक्ष मोहन घुले,‎ नाना‎ कलागते, मारुती दिवटे, अमर‎ नायको, मयूर‎ गवळी,‎ मनोज उच्चे,‎ गणेश‎ कारभारी,‎ अमोल‎ कोकरे,‎ मकरंद‎ कदम, कोकरे सर,माणिक कांबळे,‎ वसंत कांबळे, फिरोज‎ पठाण, महादेव‎ राठोड, आनंद गाडेकर‎ आदी‎ मान्यवर उपस्थित होते.‎ उपस्थित‎ मान्यवरांच्या हस्ते‎ विधिवत पूजन करून‎ कामाची सुरुवात‎ करण्यात आली.‎

 

या‎ सांस्कृतिक भवनामुळे गवळी समाजातील‎ बांधवांना‎ अत्यंत‎ माफक दरात छोटे-मोठे‎ घरगुती तसेच‎ सामाजिक‎ कार्यक्रम आयोजित करता‎ येणार असून समाजातील‎ ऐक्य, संवाद आणि सांस्कृतिक जडणघडण‎ अधिक बळकट‎ होणार आहे. कार्यक्रमास गवळी‎ समाजातील नागरिकांसह‎ प्रभागातील‎ रहिवाशांनीही मोठी‎ उपस्थिती‎ दर्शविली.‎ गवळी समाजाचे‎ ‘हक्काचे‎ सांस्कृतिक भवन’ उभारण्यासाठी‎ घेतलेल्या पुढाकाराबद्दल‎ किसन‎ जाधव‎ आणि‎ नागेश‎ गायकवाड यांचे समाजातर्फे मनःपूर्वक‎ आभार व्यक्त‎ करण्यात‎ आले.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button