crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जोडप्यावर चाकूने वार जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या विजापूर नाका पोलिसांनी आवळल्या मुसक्या मुद्देमाल हस्तगत:-पोलिस आयुक्त…

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

फिर्यादीने आणि साक्षीदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि साक्षीदार हे विजापूर रोड सोलापूर येथील आदित्य हॉटेल येथे रस्त्यालगत थांबले असताना, तीन अज्ञात इसमानी फिर्यादीवर आणि साक्षीदारावर वार करून गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरी चोरी करून नेले.याबाबत फिर्यादीने आणि साक्षीदाराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास शितल कुमार गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक करत होते.

 

गुन्हा उघडकीस आणण्याकरता विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रेखाचित्रकार बोलवून फिर्यादी यांनी सांगितलेले वर्णनाप्रमाणे रेखाचित्र रेखाटले आणि सदरचे आरोपी हे पोलीस मुख्यालय सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी गायकवाड आणि त्यांचे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. यावरून विकी गायकवाड यास बाळे ब्रिज सोलापूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले.

 

 

यावेळी आरोपीकडून सोन्याची चैन गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल एकूण एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार,पोलीस आयुक्त परिमंडळ विजय कबाडे,दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रमुख पार पाडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button