maharashtrapoliticalsocialsolapur

नगरसेवक‎ किसन जाधव व नागेश गायकवाड‎ यांच्या‎ प्रयत्नातून‎ प्रभाग २२‎ मध्ये ५ रस्त्यांच्या‎ काँक्रीटीकरण व‎ डांबरीकरण‎ कामांचा‎ शुभारंभ

दर्जेदार व‎ टिकाऊ सुविधा मिळाल्याने‎ नागरिकांचे जीवनमान‎ उंचावणार”‎ – किसन‎ जाधव

 

 

सोलापूर -‎

 

सोलापूर महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक २२ मधील नागरिकांना दर्जेदार आणि‎ टिकाऊ‎ मूलभूत‎ सुविधा‎ उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने‎ नगरसेवक‎ किसन जाधव आणि‎ नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या‎ विशेष‎ प्रयत्नातून‎ पाच रस्त्यांच्या‎ काँक्रीटीकरण‎ व डांबरीकरण कामांचा शुभारंभ‎ मोठ्या‎ उत्साहात करण्यात आला.या‎ प्रसंगी‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव म्हणाले‎ प्रभागातील नागरिकांना अतिउच्च‎ प्रतीच्या‎ सुविधा उपलब्ध‎ करून देण्यासाठी‎ आम्ही सातत्याने‎ प्रयत्नशील आहोत.‎ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी‎ आणि‎ प्रभागाचा सर्वांगीण‎ विकास साधण्यासाठी‎ आणखी निधी खेचून‎ आणला जाईल.‎ आम्ही‎ या‎ कामांद्वारे‎ नागरिकांचा विश्वास कायम‎ ठेवू‎ असे त्यांनी‎ सांगितले.राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष तथा‎ राज्याचे‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार, तसेच‎ प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ महाराष्ट्र‎ राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय‎ मामा‎ भरणे ,महाराष्ट्र‎ राज्याचे ग्रामविकास‎ मंत्री‎ तथा‎ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे आणि सोलापूर शहर‎ मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे आमदार‎ देवेंद्र‎ कोठे व महायुती‎ सरकार यांच्या सहकार्याने हा विकास आराखडा साकारण्यात‎ आला आहे.

 

 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ‎ साठे नागरी वस्ती‎ सुधारणा‎ योजना‎ (सन‎ २०२४-२५) अंतर्गत‎ आम्रपाली‎ परिसर कडे‎ जाणारा रस्त्यासाठी १२‎ लाख१५‎ हजार९८६ रु, प्रभाकर गायकवाड घर‎ ते‎ तळभंडारे‎ चौक रस्त्यासाठी‎ १३लाख‎ ३२हजार‎ ३२६‎ रुपये,‎ तळ भंडारे‎ चौक ते‎ चांद‎ तारा चौक‎ पर्यंत‎ रस्ता करणे १३‎ लाख‎ ३२‎ हजार‎ ३२६ रुपयें, मोठी इराण्णा‎ वस्ती‎ जवळ‎ जाणारा‎ रस्ता काँक्रिटीकरण‎ करणे‎ रक्कम १२लाख३० हजार ०९६ रुपये‎ तसेच‎ महाराष्ट्र‎ सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत सुशील मराठी‎ शाळा‎ ते डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर‎ चौक‎ पर्यंत रस्ता करणे कामी‎ ३४ लाख‎ ९६‎ हजार‎ ८२५ रुपये असे‎ एकूण ८६‎ लाख‎ ०७‎ हजार;५५९रुपयांचा असा‎ सर्वाधिक‎ निधी मंजूर करून‎ घेण्यात‎ आला.

 

 

या सर्व‎ रस्त्यांच्या‎ काँक्रीटीकरण‎ व डांबरीकरण‎ कामांचा शुभारंभ‎ पूजन विधीपूर्वक‎ करण्यात आला.‎ या प्रसंगी‎ ॲड होसमनी‎ , शिवलिंग जामदार,‎ ॲड. कामतकर मॅडम, रजिया अफा शेख,‎ सुनीता‎ बोरा,रफिक भाई शेख,‎ मोतीलाल करबसू‎ जाधव,तांबोळी चाचा,अब्दुल सय्यद,‎ गौतम‎ सरवदे,जाकीर‎ कवठेकर,‎ शहाजान कवठेकर‎ संजय‎ भडंगे,‎ सोनू‎ तळभंडारे, जाकीर‎ फुलारी,‎ शरणाप्पा घंटे,रमेश चलवादि,बाळू‎ कोरे महाराज‎ ,विजय तळभंडारे,अभय साळुंखे,‎ नंदाताई‎ लामतुरे,‎ रुक्मिणी‎ लामतुरे, अपर्णा‎ लांडगे, रोमा गायकवाड,‎ मनीषा लांडगे,‎ नागदेवी जाधव, महानंदा‎ पुजारी,पार्वती‎ चौधरी, वंदना लामतुरे,‎ निर्मला बनसोडे, छायाबाई आवळे,‎ विजया शेळके,‎ प्रेमा सरवदे, शमशाद‎ लालकोट,‎ साजन‎ शेख, आयुब‎ तांबोळी,‎ शब्बीर‎ शेख, उदय‎ कांबळे, विजय तळभंडारे, संतोष‎ उर्फ‎ ऋतिक गायकवाड,राजू सय्यद,‎ अमीर‎ काजी, विलास‎ लामतुरे, पंडित लामतुरे,‎ प्रकाश लामतुरे‎ आदी‎ मान्यवर आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते.

 

 

 

प्रभाग क्रमांक‎ २२ मध्ये‎ मागील काही‎ वर्षांपासून‎ मूलभूत सुविधांचा‎ अभाव‎ जाणवत होता. या‎ नव्या काँक्रीटीकरण व डांबरीकरण‎ कामांमुळे‎ नागरिकांना मोठा दिलासा‎ मिळणार‎ असून, प्रभागाच्या‎ विकासकामांना‎ वेग मिळणार‎ आहे.‎ नागरिकांनी नगरसेवक किसन‎ जाधव आणि नागेश‎ गायकवाड‎ यांचे‎ पुष्पहार,‎ मखमली‎ टोपी घालून मनःपूर्वक‎ आभार‎ मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button