crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अकॅडमीच्या संचालकाला सत्र न्यायालया कडून जामीन मंजूर:- ॲड. शशी कुलकर्णी…

सोलापूर

मंगळवेढा येथील रहिवासी व राजे सैनिकअकॅडमी या अकॅडमी चे संचालक श्री. सतीश मधुकर महामुनी वय-39 वर्षे रा. मंगळवेढा एकास नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात, त्यांना जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने पारित केला.

यात थोडक्यात तक्रार अशी की, अकॅडमी संचालक सतीश महामुनी हे मागील बरेच वर्षापासून ते त्यांची अकॅडमी चालवतात .त्यामध्ये ते विद्यार्थीना नोकरी करिता भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचे काम करतात.दिनांक 23/01/2023 रोजी तक्रारदार इकबाल इनामदार यांनी रुपये 25000/- भरून प्रवेश घेतला होता.परंतु त्यांना वनखात्यात भरतीसाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी काही रक्कम जमा केली परंतु त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीस सांगून राज्य – झारखंड, रांची येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून स्वतः आठ लाख दहा हजार व युसुफ पाटील यांचे मार्फत पाच लाख असे एकूण 13 लाख 10 हजार एवढी रक्कम घेऊन फिर्यादीस नोकरी नदिल्याच्या कारणावरून मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये सतीश महामुनी यांना दिनांक 19/08/2025 रोजी अटक झाली होती. त्यांनी मंगळवेढा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज मंगळवेढा न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर त्यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात ॲड. शशी कुलकर्णी यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन सरकारी वकिलांनी तपास अपूर्ण असल्याच्या कारणावरून जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला.त्यामध्ये संचालकांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी बाबतचा तपास पूर्ण झाला आहे, तपासात काही निष्पन्न झाले नाही ,आरोपीची संस्था बरेच वर्षापासून विद्यार्थ्यांन साठी काम करीत आहे,आरोपीस यापुढे अटकेत ठेवता येणार नाही. या पृष्ठर्थ त्यांनी मा.सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा सादर केला. संचालकाच्या तर्फेचा युक्तिवाद विचारात घेऊन पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने रक्कम रुपये 25000/- चे जात मुचलक्यावर व पोलीस स्टेशन हजेरीच्या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला.

यात संचालका तर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. ओंकार बुरकुल, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. संकेत पवार यांनी काम पाहिले.
केस- फौजदारी जामीन अर्ज क्र.685/2025.
कोर्ट- सत्र न्यायाधिश ए . एस सलगर साहेब

अकॅडमीच्या संचालकाला सत्र न्यायालया कडून जामीन मंजूर
सोलापूर, -मंगळवेढा येथील रहिवासी व राजे सैनिकअकॅडमी या अकॅडमी चे संचालक श्री. सतीश मधुकर महामुनी वय-39 वर्षे रा. मंगळवेढा एकास नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात, त्यांना जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने पारित केला.

यात थोडक्यात तक्रार अशी की, अकॅडमी संचालक सतीश महामुनी हे मागील
बरेच वर्षापासून ते त्यांची अकॅडमी चालवतात .त्यामध्ये ते विद्यार्थीना नोकरी करिता भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचे काम करतात.दिनांक 23/01/2023 रोजी तक्रारदार इकबाल इनामदार यांनी रुपये 25000/- भरून प्रवेश घेतला होता.परंतु त्यांना वनखात्यात भरतीसाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी काही रक्कम जमा केली परंतु त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीस सांगून राज्य – झारखंड, रांची येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून स्वतः आठ लाख दहा हजार व युसुफ पाटील यांचे मार्फत पाच लाख असे एकूण 13 लाख 10 हजार एवढी रक्कम घेऊन फिर्यादीस नोकरी नदिल्याच्या कारणावरून मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये सतीश महामुनी यांना दिनांक 19/08/2025 रोजी अटक झाली होती. त्यांनी मंगळवेढा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज मंगळवेढा न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर त्यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात ॲड. शशी कुलकर्णी यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन सरकारी वकिलांनी तपास अपूर्ण असल्याच्या कारणावरून जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला.त्यामध्ये संचालकांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी बाबतचा तपास पूर्ण झाला आहे, तपासात काही निष्पन्न झाले नाही ,आरोपीची संस्था बरेच वर्षापासून विद्यार्थ्यांन साठी काम करीत आहे,आरोपीस यापुढे अटकेत ठेवता येणार नाही. या पृष्ठर्थ त्यांनी मा.सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा सादर केला. संचालकाच्या तर्फेचा युक्तिवाद विचारात घेऊन पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने रक्कम रुपये 25000/- चे जात मुचलक्यावर व पोलीस स्टेशन हजेरीच्या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला.

यात संचालका तर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. ओंकार बुरकुल, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. संकेत पवार यांनी काम पाहिले.
केस- फौजदारी जामीन अर्ज क्र.685/2025.
कोर्ट- सत्र न्यायाधिश ए . एस सलगर साहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button