प्रभाग २४ मध्ये भाजपा कडून OBC उमेदवारांची भाऊगर्दी…
विशाल गायकवाड, अश्विनी चव्हाण , नरेंद्र काळे प्रभाग २४ साठी इच्छुक उमेदवारांपैकी महत्त्वाचे चेहरे...

सोलापूर
येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी मध्ये जुळे सोलापूर मधील प्रभाग २४ मतदार OBC उमेदवारांमध्ये होणार चढाओढ. सद्यस्थितीत विद्यमान नगरसेविका अश्विनी चव्हाण आहेत .त्यांचे बंधू सचिन चव्हाण हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आहेत .२०१७ साली माजी विरोधी पक्षनेते तथा माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उमेदवारी रद्द करून अश्विनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.
सद्यस्थितीत भाजपाकडे प्रभाग २४ साठी इतर पक्षातून फिरून आलेले पूर्वाश्रमीचे माजी आमदार दिलीप माने समर्थक व सदयस्थितीत विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख समर्थक विशाल गायकवाड यांची सुद्धा उमेदवारासाठी दावेदारी आहे. परंतु ही तिघेही उमेदवारीसाठी आपापल्या नेत्याकडे जोरदार प्रयत्न करत असून ऐनवेळेस तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी व आमदार सुभाष देशमुख यांच्या २०२४ च्या निवडणुकीवेळी या तिघांनी केलेल्या प्रचाराचा पक्ष नेतृत्व नक्कीच विचार करतील.परंतु या सर्वांचे नशीब होऊ घातलेल्या ११ नोव्हेंबरच्या आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. गटातटामुळे या तिघांची सुद्धा उमेदवारी गुलदस्त्यात असल्याचं बोलल जात आहे.



