crimemaharashtrapoliticalsocialsolapur

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचे 04 सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेकडुन अटक….

कारवाईत एकूण वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 1,19,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर

दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 02.30 वा. ते सायकाळी 06.00 वा.च्या दरम्यान गोंविदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापुर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेवुन घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झालेबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विजापुर नाका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(3). 305(A) प्रमाणे गुन्हा करण्यात आला होता.

 

 

 

तसेच दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 03.00 वा. च्या दरम्यान कोणार्क नगर, जुळे सोलापुर येथे देखील बंद घराचे कुलूप तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झाल्याबाबत विजापुर नाका पोलीस नाका पोलीस ठाण्यात अनोळखी इमाम विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 (A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

हे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणुन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

 

या गुन्ह्यात दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने, या दोन्ही घटनांचे गांर्भिय ओळखुन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील चार आरोपीची ओळख पटवली.

 

 

 

त्यानंतर दिनांक 29/10/2025 रोजी रात्रौ 12.00 वा. चे सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की, चार इसम हे जुना पुना नाका परिसरात संशयीतरित्या फिरत आहेत. या बातमीची शहा-निशा करुन कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने तत्काळ जुना पुना नाक्याजवळील आकांक्षा टुर्स ट्रॅव्हल्स जवळ, सोलापूर येथे धाव घेऊन येथून 04 इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांची नावे (01) शेरअली मोती सय्यद, वय-25 वर्ष, रा. भोसा रोड, इंदीरा नगर, मशिदजवळ, जि. यवतमाळ, (2) प्रसन्न प्रमोद मेश्राम, वय-24 वर्ष, रा.डी.एड कॉलेज, भोसा रोड, जि.यवतमाळ, (3) चंदु हिरा भतकल, वय-39 वर्ष, रा.बोरगांव, मेघे टेकडी, जि. वर्धा, (4) रोशन पुरुषोत्तम प्रधान, वय-27 वर्ष, रा. सुराना ले-आउट, अंबिका नगर, जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितले. या इसमांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातुन या दोन गुन्हयातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 1,19,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, आरोर्पीना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोर्पीना पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

या आरोपींबाबत अधिक तपास केला असता, हे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या विरुध्द यापुर्वी यवतमाळ, चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये खुन, चोरी, घरफोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे-शेरअली मोती सय्यद याचे विरुध्द यवतमाळ शहर पोलीस ठाणे, यवतमाळ येथे खुनाचा व मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

 

 

 

ही कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ अश्विनी पाटील, पोलीस उप- आयुक्त गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार जावीद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धिरज सातपुते, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, राजु मुदगल तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी पणे ही कामगिरी पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button