रस्ते विकास कामामुळे नागरिकांना उच्च दर्जाचे जीवन मिळणार-किसन जाधव…
किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ...

सोलापूर –
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन २०२३- २४ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यंतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून ११लाख २८,५८८ खर्चित सोनी नगर मोदी हुडको येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कामाचे धार्मिक विधिवत पूजन होऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी हरीश तेलगू ,सिद्राम वाडेकर, आमिर तांबोळी, फैयाज शेख, धनंजय नगरकर, जनार्दन कांबळे, गणेश दुगाने, मधुकर कश्यप, माणिक बेळं, विकी संगटे, आदिल भाई मुल्ला, मुन्ना कोळूर, वसंत गोरे, यलगुंडे मावशी, सविताताई बंगाली नागम्मा बेडरू, शकुंतला चिंतलवार, अंबिका म्हेत्रे, राबिया शेख, शारदा माशाळकर, मीनाक्षी म्हेत्रे, रेणुका म्हेत्रे, पद्माताई गोरे, नीलम गोरे, अनिता भंडारे यांच्यासह प्रभागातील तसेच या परिसरातील नागरिकांची मोठे उपस्थिती होती. दरम्यान चांगले रस्ते असल्याने वाहतूक कमी होईल .

आणि वायू प्रदूषण कमी होईल ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल चांगले रस्ते असल्याने व्यवसाय आणि उद्योगांना फायदा होईल ज्यामुळे आर्थिक विकास होईल चांगले रस्ते असल्याने नागरिकांना येण्या जाण्याची सुविधा होईल आणि त्यांचा वेळ देखील वाचेल रस्ते विकास कामामुळे नागरिकांना उच्च दर्जाचे जीवन मिळणार आहे चांगले रस्ते असल्याने अपघाताचे पण कमी होईल आणि नागरिकांची सुरक्षितता नक्कीच वाढेल रस्ते विकास कामामुळे नागरिकांना उच्च दर्जाचे रस्ते मिळणार असल्याने त्यांना अनेक फायदे होतील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळावा यासाठी प्रभाग क्रमांक २२ येथे रस्ता कामाचा काँक्रिटीकरण करणे शुभारंभ करण्यात आला .

नागरिकांना अतिउच्च दर्जाचे सुविधा मिळावे या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे असे यावेळी या रस्ते कॉंक्रिटेकंड शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले. प्रभाग क्रमांक २२ च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या पुढील काळात देखील प्रभाग 22चा सर्वांगीण विकास होईल अशी ग्वाही देखील यावेळी उपस्थित नागरिकांना किसन जाधव यांनी दिलं.



