crimemaharashtrapoliticalsocialsolapur

नगर परिषदेतील कर्मचाऱ्यास शिवीगाळ मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवकाची निर्दोष मुक्तता:- अॅड. मिलिंद थोबडे…

 

सोलापुर

 

: अक्कलकोट नगर परिषदेतील स्वच्छ भारत अभियानाचे काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अक्कलकोट नगर परिषदेचे माजी नगरसेवक उत्तम शेकाप्पा गायकवाड रा. भिमनगर अक्कलकोट यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली
यात हकीकत अशी की, अक्कलकोट नगर परिषदेतील तत्कालीन संगणक अभियंता भालचंद्र सदानंद उंबरजे यांना दि. 19/12/2015 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचारी विठ्ठल तेली व सुधाकर माळवदकर यांचेसह स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची स्थळपाहणी करून तपासणी करण्याचे आदेश दिल्याने ते सर्वजण भीम नगर अक्कलकोट येथील घरांची तपासणी करत बुद्ध विहार जवळ गेले असताना तत्कालीन नगरसेवक उत्तम गायकवाड यांनी भालचंद्र उंबरजे यांना पाहुन तुम्ही शासकीय काम व्यवस्थित करत नाही असे म्हणून शिवीगाळ करून त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून हाताने मारहाण केली व धमकावले अशा आशयाची फिर्याद भालचंद्र उंबरजे यांनी दाखल केल्यावरुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

 

 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार रामू पवार यांनी करून मे. न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.
खटल्याचे सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले.

 

 

खटल्याचे अंतिम सुनावणीवेळी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षीदार हे कर्तव्य बजावत असल्याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही, तथाकथित घटना पाहणारा कोणीही स्वतंत्र साक्षीदार नाही व फिर्याद देण्यास झालेल्या विलंबाचे कारण देण्यात आलेले नाही असे मुद्दे मांडले, ते ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर जे कटारिया यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

 

यात आरोपी तर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. राजकुमार मात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड प्रकाश जन्नू यांनी काम पाहीले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button