maharashtrapoliticalsocialsolapur

श्री इंद्रभवानी देवीची पालखी व नंदी ध्वजासह घातल्या ५ प्रदक्षिणा…

 

सोलापूर

नवरात्र उत्सवात श्री इंद्रभवानी देवीची १५ दिवस विधिवत पूजा आनंदी वातावरणात संपन्न झाली. मंगळवारी देवी मातेस पंचामृत घालून आईची पालखी व नंदी ध्वजासह ५ प्रदक्षिणा घालण्यात आल्या.यानंतर देवीची महापूजा संपन्न झाली.यावेळी नंदी ध्वजाचे मानकरी , पालखीचे मानकरी , आराधी व सर्वच पदाधिकाऱ्यांना मान पान देऊन नवरात्रीच्या उत्सवास थाटात सांगता करण्यात आली.

या प्रसंगी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शंकर गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी गायकवाड, शिवलिंग गायकवाड, प्रशांत इंगळे, किशोर सरवदे, शेखर वाघमारे , रोहित भोसले, दादासाहेब सरवदे,गणेश भोसले, रमेश दोरकर, विजू दोरकर, रवी सरवदे , संतोष भोसले , यतिराज गायकवाड , जितू पाचंगे, गणेश सरवदे, सचिन भोसले , बाबा भोसले, सुरज भोसले यांची उपस्थिती होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button