maharashtrapoliticalsocialsolapur

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे विविध विकास कामांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद  चंदनशिवे यांचे पालिका आयुक्तांना निवेदन.

 

सोलापूर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार विकास योजने अंतर्गत अॅम्फी थिएटर च्या कामाची सुरुवात झालेली असुन ते काम करण्यासाठी क्रेनचा वापर होत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डोमचे काम करण्यासाठी क्रेन उपलब्ध करुन दिलेले आहे. ती क्रेन उपलब्ध असेपर्यंत तेथील डोमच्या वरती एक्झहॉस्ट फॅन तसेच त्या डोमवरील व आतील बाजुस असलेले इलेक्ट्रीक पॉइंट/फिक्सचर्स बसविणे अत्यंत गरजेचे आहे. येथील इंजिनिअर यांच्या सुचनेनुसार लाईट फिटींगचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील डोमचे काम क्रेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. त्याप्रमाणे तेथे क्रेन उपलब्ध असेपर्यंत त्या क्रेन संबंधीत कामे करण्यास संबंधीतास आदेश होण्याबाबत  सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी निवेदन दिले.

 

 

यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे अतिरिक्त आयुक्त मा. संदीप कारंजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, आदित्य साबळे, भीमा मस्के उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button