crimemaharashtrapoliticalsocialsolapur

पत्नीची छेडछाड केल्याने युवकाच्या खून प्रकरणात दोघेजण निर्दोष … ॲड. जयदीप माने…

 

पत्नीची छेडछाड केल्यामुळे चिडून जाऊन अमर ज्ञानु खिलारे रा. शिरभावी ता.सांगोला याचा चाकुने मारुन खून केल्याच्या आरोपातुन लक्ष्मण जगन्नाथ तांबे व देवप्पा पांडूरंग तांबे दोघे रा. धायटी, ता. सांगोला यांची पंढरपूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

 

मयत अमर खिलारे हा पेंटींगचे काम करत होता. आरोपीच्या घराचे पेंटींग करण्याचे काम त्याने घेतले होते. त्याचा मृतदेह धायटी शिवारातील तांबे मळ्यात मिळून आला होता .त्या संदर्भात त्याचा भाऊ चंद्रकांत खिलारे याने सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की पेंटिंग काम करण्यास गेला असताना मयत अमर याने आरोपीच्या पत्नीची छेडछाड केली म्हणुन चिडून जाऊन दोन्ही आरोपींनी अमर याचा चाकुने मारुन खुन केला. तपास पूर्ण झाल्यानंतर सांगोला पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रक दाखल केले होते.

 

आरोपीविरुध्द असलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह्य व पुरेसा नसल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button