crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : घटनास्थळ पंचाची महत्त्वपूर्ण साक्षी:-अँड.उज्वल निकम { विशेष सरकारी वकील}

 

सोलापूर

ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाली.

यातील घटनास्थळ पंच साक्षीदार सागर गागडे याने दि-,19/5/2025 रोजी न्यायालयासमोर साक्ष देतेवेळेस सांगितले होते की, दिनांक 12/6/2019 रोजी ते घटनास्थळी गेले, घटनास्थळा वरून एक ग्लास, रॉयल स्टॅग कंपनीच्या बाटल्या, दोन काळया रंगाची प्लास्टिकची पोती, कोयते, हातोडा,सत्तुर, व्हिनेगरच्या बाटल्या इत्यादी वस्तू तसेच एका पोत्यामध्ये दोन हात, दोन पाय आणि एक मुंडके दिसून आले तर दुसऱ्या पोत्यात हात पाय नसलेले धड असे मिळून आले, घटनास्थळावरून एकूण 26 वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या. अशी साक्ष नोंदविली होती, त्यावर आजरोजी राहिलेला उलट तपास आरोपींच्या वकिलांनी घेतला, आरोपींच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नास नकारात्मक उत्तरे दिली.

सदर खटल्यास पुढील तारीख 21/07/2025 ही तारीख नेमण्यात आली.

*या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे,आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button