crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नेताजी बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक यांना महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून “पोलीस शौर्य पदक ” जाहीर….

सोलापूर

भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या विविध पदकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील श्री. नेताजी बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक, माढा पोलीस ठाणे यांना आज “पोलीस शौर्य ” पदक जाहीर करण्यात आले आहे.

सपोनि नेताजी बंडगर यांना हा सन्मान २०१७ साली गडचिरोली जिल्ह्यातील मौजा हेमलकसा कारमपल्ली रस्त्यावर झालेल्या भीषण नक्षलवादी चकमकी दरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. त्या दिवशी सी-६० पथकाचे जवान कोठी येथील पोस्टवरुन एमपीव्ही वाहनांतून भामरागडला परतत असताना माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत अचानक हल्ला चढवला. विस्फोटाच्या तीव्र धक्क्याने वाहनांचे नुकसान झाले, काही जवान जखमी झाले आणि काहीजण अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळी माओवाद्यांकडून प्रखर गोळीबार सुरु झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जीवाची पर्वा न करता, जवानांनी आपल्या जखमी सहकाऱ्यांचे व स्वतःचे प्राण वाचवत शत्रूच्या गोळीबाराला तोंड दिले. त्यांनी विवेकबुद्धी, शौर्य आणि चपळाई यांचा अद्भुत संगम दाखवत माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही कारवाई केवळ बचावापुरती मर्यादित न राहता, जवानांनी माघार न घेता शत्रूचा सामना करत परिस्थिती आपल्या बाजूने वळवली. याच धैर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत, राष्ट्रपतीं महोदयांनी सपोनि नेताजी बंडगर यांना “पोलीस शौर्य पदक” प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापर ग्रामीण यांनी “पोलीस शौर्य पदक” प्राप्त अधिकारी श्री. नेताजी बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक, यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa